Home महत्वाची बातमी प्रेमविवाह न करण्याच्या ‘त्या’ शपथेवर राजकारण तापले.!

प्रेमविवाह न करण्याच्या ‘त्या’ शपथेवर राजकारण तापले.!

135

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

चांदूर रेल्वेच्या महिला महाविद्यालयातील प्रकार

विवाह हा वैयक्तीक प्रश्न – आदित्य ठाकरे

तर पंकजा मुंडेंनी ट्विट करून तिव्र नाराजी केली व्यक्त.

वर्धा , दि. १५ :- ‘कोणी कुणाशी विवाह करावा आणि कसा करावा, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात इतरांनी लक्ष घालू नये किंवा तशी कोणावर बळजबरी केली जाऊ नये.’

असे म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेतील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रेमविवाह न करण्याची शपथेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या शपथवर तिव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता प्रेमविवाह न करण्याच्या ‘त्या’ शपथेवर राज्यातील राजकारण तापले आहे.
जागतिक प्रेमदिनाच्या आदल्या दिवशी चांदूर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या टेंभुर्णी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या महाविद्यालातील विद्यार्थिनींना ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्राध्यापकांनी विद्यार्थीनींना हि शपथ दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. या प्रकारे एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’ अशी शपथ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थिनींकडून घेतली आहे.

मात्र भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत आक्षेप नोंदविला आहे. ” चांदूर रेल्वे येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचीत्र प्रकार घडला. शपथ मुलींनाच का ? आणि ती ही प्रेम न करण्याची. ‘मुलींपेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर ऍसिड फेकणार नाही, जिवंत जळणार नाही, वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार असेही त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे. तर विवाह हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात इतरांनी लक्ष घालू नये किंवा तशी कोणावर बळजबरी केली जाऊ नये असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना म्हटले. त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील हे प्रकरण आता राज्यपातळीवर पोहचले आहे. मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना तरुण, पुरुषांना सदर शपथ घेण्याची गरज आहे. परंतु चांदूर रेल्वे च्या एका प्राध्यापकाने तरुणींना शपथ देत आपल्या अज्ञानाची प्रचीती दिल्याचे दिसत आहे.

Previous articleआयटक सेलु अंगणवाडी कर्मचारी मेळावा.!
Next articleब्रेकींग न्युज इन नांदेड
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.