Home विदर्भ आयटक सेलु अंगणवाडी कर्मचारी मेळावा.!

आयटक सेलु अंगणवाडी कर्मचारी मेळावा.!

382
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

अंगणवाडी समायोजन करुन बंद करण्याचा कटकारस्तान विरोधात लढण्यासाठी सज्ज राहा – दिलीप उटाणे

वर्धा , आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्यावतिने सेलु अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा १५ फेब्रुवारी २०२० रोजी रेखा काचोळे यांच्या अध्यक्षतेखाली सेलू पंचायत समिती सभागृहात पार पडला मेळाव्याचे उदघाटक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती सोनुने .मुख्य मार्गदर्शक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष काँ दिलीप उटाणे तर अतिथी जिल्हा अध्यक्ष विजया पावडे जिल्हा सचिव वंदना कोळणकर कोषाध्यक्ष मैना उईके दुर्गा गवई पारबता जुनघरे विजया कौरती यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला .
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न व शासनाची भुमीका या बाबत मुख्य मार्गदर्शन करताना संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांनी आयुक्त कार्यालयाने काढलेला आदेशाचा निषेध करीत अंगणवाडी हि फक्त मुलांनसाठी नसून सर्व लाभार्थ्यासांठी आहे .
अंगणवाडी समायोजन करुन बंद करण्याचा कट कारस्तान विरोधात लढण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन केले .
तेपुढे म्हणाले आयटक संघटनेनी १० वर्षापुर्वीच इंग्रजी शाळा प्रमाणे मुलांना अनोपचारी शिक्षण शिकविण्यासाठी सेविकांना प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी केली होती गावा गावात काँन्व्हेट उघले असून सुजान नागरीकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे या अपेक्षानीच प्रवेश घेतला त्यामुळे अंगणवाडी मुलांची संख्या कमी झाली.याला शासनच जबाबदार आहे .
सर्वोच्च न्यायालयाने २००८ मध्ये ३ ते ६ वयोगटातील मुलांचे पुर्व प्राथमिक शिक्षण फक्त अंगणवाडीतच व्हावे असे सांगितले तरी काँन्व्हेटला कोणी मान्यता दिली. अशा प्रश्न निर्माण होतो.
अंगणवाडीत केंद्रात आकार शिक्षणातून अनोपचारी शिक्षण देण्याचे आदेश आहेत ते पालकांना मान्य नाही .त्यामुळे सेविका समोर धर्मसंकट निर्माण झाला आहे .पालकांच्या इच्छानुसार इंग्रजी अक्षरांची ओळख व पोयम शिकविने गरजेचे आहे – तर शासनाच्या मते आकार अभ्यासक्रमा नुसार कागदाचे वस्तू लोढणे .उलटे चालने इत्यादी प्रत्येक दिवशी वेग वेगळी कृती करुन शिकविणे. इत्यादी .
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्का सोबत कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करणे गरजेचे आहे केंद्र सरकारने अनेक आश्वासन दिले परंतु आश्वासन पुर्ण न करता फक्त तोंडाला पाने पुसले आहे.
पंतप्रधान जिवनज्योती विमा योजना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना* अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आँक्टोबर २०१८ पासून लागू करण्यात आले असे स्वतः पंतप्रधान नरेन्द मोदी यांनी जाहीर केले . त्याची अमंलबजावणी होत नाही .
चार वर्षा पुर्वी सेवानिवृत सेविका मदतनिसांना एकरक्कमी लाभ नाही.राज्यातील ठाकरे सकारने आपल्या समान किमान कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्याचे जाहिर केले .ते येणाऱ्या बजेट मध्येच कळेल
असे सविस्तर मार्गदर्शन उटाणे यांनी केले .
मेळाव्याचे प्रास्तावीक जिल्हा सचिव वंदना कोळणकर यांनी सेलु तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या ठेवीत त्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली तसेच मेळावा घेण्याचा उद्देश प्रास्ताविक करुन सांगितले .
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापीकांना जाळण्याचा निषेध करीत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा ठराव ठेवला आणी सर्वानी निषेध निषेध करीत पारीत करण्यात आला.
बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती सोनुने यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची पुजन करुन उदघाटन केले तर महिलांनी उपस्थित केलेल्या १२ मागण्या दोन आठवड्यात निकाली काढण्यात येतील असे सांगितले .
जिल्हा अध्यक्ष विजया पावडे यांच्या राज्य शासनाने समान किमान कार्यक्रमात जाहीर केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे तसे यामागणी साठी आयोजित २६ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबई मोर्चात मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले
मैना उईके सुनिता भगत
यांनी विचार व्यक्त केले .विविध महिलांनी विविध प्रश्न उपस्थित केले
मेळाव्याचे संचालन चन्ने तर आभार योगीनी पराते यांनी केले .
मेळाव्यात शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते

Previous articleपैशाची मागणी करणाऱ्या शासनाच्या पांढर्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल
Next articleप्रेमविवाह न करण्याच्या ‘त्या’ शपथेवर राजकारण तापले.!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here