Home महत्वाची बातमी औरंगाबाद मनपा शाळाची व्यवस्थापन ने घेतली “राऊंड टेबल चर्चा”

औरंगाबाद मनपा शाळाची व्यवस्थापन ने घेतली “राऊंड टेबल चर्चा”

112

लियाकत शाह

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष इल्हाजुद्दीन फारुकी यांनी मांडले परखड मत
खोल्यांची कमतरता, शिक्षकांची २६ पदे रिक्त, १५-२० वर्षांपासून पदोन्नत्या रखडलेल्या, पोर्टल द्वारे १८ शिक्षकांची नियुक्ती अद्याप नाही. एकंदरीत प्रशासन, लोक प्रतिनिधी यांचे मातृभाषेतून मिळणाऱ्या शिक्षणाकडे दुर्लक्ष व उदासीन धोरण. असे मत इल्हाजुद्दीन फारुकी यानी मनपा शाळा व्यवस्थापन समितीत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष इल्हाजुद्दीन फारुकी यांनी मांडले. तसेच या वेडी आशीष चौधरी यांचे ही आभार मानले. महापालिकेच्या मराठीसह उर्दू माध्यमांच्याही शाळा आहेत. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळायला हवे, यासाठी इतरत्र प्रयत्न होत असताना आपली महापालिका त्यापासून दूर आहे. एकट्या उर्दू माध्यमांच्या शाळांमधील १४१ पैकी २६ पदे रिक्त आहेत. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक आले तर, त्यांचे वेतन दिले जात नाही. अनेक शाळांच्या इमारती चांगल्या आहेत, परंतु उपक्रमांचा अभाव आहे. नारेगावसारख्या चांगल्या शाळाही आहेत. त्यांची संख्या कमी आहे. त्यांच्यातील सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केले जाते. शाळेकडे विद्यार्थी संख्या अधिक अन् वर्ग खोल्यांची संख्या कमी आहे. गुणवत्ता सुधारणेबाबत आपण बोलत असू अशा छोट्या छोट्या गोष्टींचाही परिणाम होतो. त्यामुळे प्रशासनाला शाळा, शिक्षण याबाबत अधिक जागरूक असायला हवे. महापालिकेने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निश्चित कृतीयुक्त
आराखडा महापालिकेचा असायला हवा.