Home मराठवाडा नांदेड च्या जिल्हाधिकारी पदि पी.सीवा,संकर यांची नेमणूक

नांदेड च्या जिल्हाधिकारी पदि पी.सीवा,संकर यांची नेमणूक

58
0

नांदेड , दि.14 ( राजेश भांगे ) :-
तीन वर्षा पेक्षा अधिक काळा पासुन नांदेड जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावलेले अरूण डोंगरे यांची बदली झाली असुन त्यांच्या त्या जागी रिक्त झालेल्या जागेवर नांदेड जिल्हाधिकारी म्हणून पी.सीवा, संकर यांची नेमणूक कण्यात आली.

पी.सीवा, संकर हे शिस्त आणि कडक स्वभावाचे असल्याने नांदेड जिल्ह्यातील रेती , मुरूम व ईतर गौन खनिज माफियांना आळा बसेल अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे. पी.सीवा, संकर हे २०११ मध्ये आय ए एस अधिकारी म्हणून रूजु झाले होते. वर्धा येथे सहायक जिल्हाधिकारी व गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत होते.तसेच कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त तर नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सहकारी अदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक पदि नियुक्त होते त्या नंतर ते 3 एप्रिल २०१७ पासुन परभणी येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. कडक व शिस्तबद्ध जिल्हाधिकारी म्हणून पी,सीवा,संकर यांचा परिचय आहे.