Home उत्तर महाराष्ट्र अजहर खान यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कारने सन्मानित

अजहर खान यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कारने सन्मानित

69
0

रावेर (शरीफ शेख)

दुधारे स्पोर्ट्स फाऊंडेशन व क्रीडा साधना नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार ८ फेब्रुवारी श्री कालिका देवी मंदिर संस्थान येथे आयोजित करण्यात आलेले होते यासाठी उत्तर महाराष्ट्र मधून वेगवेगळ्या तालुक्यातून क्रीडाशिक्षक व प्रशिक्षक यांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये अँग्लो उर्दू हाय स्कूल पाचोराचे क्रीडा शिक्षक मोहम्मद अजहर खान फरीद खान यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार मिळाले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री रंजीत खशाबा जाधव (ऑलिमपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे चिरंजीव) मा श्री अण्णासाहेब पाटील, मा श्री संजय दुधाणे (क्रीडा पत्रकार), श्री आनंद खरे (शिवछत्रपती पुरस्कार विजेता) यांच्या शुभहस्ते सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण संपन्न झाले. श्री अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाले. अजहर खान सर यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक शेख इकबाल सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अजहर खान यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.