Home विदर्भ तळेगाव शा. पंत येथे आष्टि रोडवर एस यु व्हि ५०० कारनी घेतला...

तळेगाव शा. पंत येथे आष्टि रोडवर एस यु व्हि ५०० कारनी घेतला पेट

169

गाडितल्या सात प्रवाश्याचा सुदैवाने वाचला जीव

वर्धा / तळेगांव (शा.पंत) , दि.12/2/2020
तळेगाव शामजी पंत येथे आज सकाळी आष्टी रोड ईनोव्हेटिव्ह शाळे समोर एक (XUV) CAR ने पेट घेतल्याची घटना घडली. याबाबतची माहिती नागरीकांकडुन पोलिस स्टेशन तळेगावला माहिती देण्यात आली.व अग्नीशमण दलाला माहिती मिळताच सकाळी 6.20 चे दरम्यान नगर परिषद आर्वी चे अग्निशमन वाहन आपल्या चमूसह सकाळी घटना स्थळावर येथुन तात्काळा घटनास्थळी पोहोचुन झालेली आगीची घटना आटोक्यात आणली.

सदर आग गाडिचे स्विच आ़न करताच स्पार्किन्ग होउन गाडीने पेट घेतला सदर गाडित सात प्रवासी प्रवास करित होते. यात सुदैवाने कोनत्याही प्रकारची जीवित हानि झाली नाहि.
हि गाडी तुमसर वरुन मित्राला घेन्याकरीता आष्टिला जात होती.अशी माहिती स्थानिक नागरिकां कडुन मिळाली आहे.या
घटनेची नोंद तळेगाव पोलिस स्टेशन तळेगाव मध्ये झाली असुन पुढिल तपास सुरु आहे.