Home मराठवाडा चाडोला शाखा डाक पाल यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या लॉगीन च्या दिवशी...

चाडोला शाखा डाक पाल यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या लॉगीन च्या दिवशी उघडले ९३ खाते.

57
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. १२ :- चाडोला मुखेड दि.६ फेब्रुवारी रोजी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा लॉगीन दिवस साजरा करण्यात आला आहे. या दिवशी चाडोला येथील शाखा डाकपाल श्री.शंकर डी.संगेवार यांनी गावातील निराधार लाभार्थी , जेष्ठ नागरिक लाभार्थी , प्रधान मंत्री मातुरत्व वंदना लाभार्थी , शालेय विध्यार्थी , प्रधान मंत्री पीक विमा लाभार्थी, गावातील नागरिकांचे एकाच दिवशी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे ९३ खाते उघडून पूर्व उपविभागात प्रथम क्रमांक मिळाला तर नांदेड विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

डाकपाल श्री. संगेवार यांनी ९३ खाते उघडल्यामुळे डाक अधीक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत यांनी अभिनंदन केले आहे.
शाखा डाक पाल यांनी दिनांक १८ फेब्रुवारी पोस्ट बँकेचे या ही पेक्षा जास्त खाते उघडण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे , असे सांगितले.
या यशा बदल मार्केटिंग एक्सिकेटीव्ह नांदेडचे श्री.सुरेश सिंगेवार व डाक आवेक्षक शेख निजाम यांनी शाखा डाक पाल श्री. संगेवार यांचे अभिनंदन केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.