Home मराठवाडा टपाल विमा विमा धारकाच्या वारसाला टपाल विभागाचा आधार..

टपाल विमा विमा धारकाच्या वारसाला टपाल विभागाचा आधार..

49
0

देगलूर दि. १२【 सुरेश सिंगेवार यांच्याकडून ME 】 आठ लाख पंचवीस हजाराचा सहाशे रुपयांचा धनादेश सुपुर्द..

भारतीय टपाल विभागातील ग्रामीण टपाल जिवण विमा पाँलिसि नरेंद्र गंगाराम जाधव रा. देगलूर हे सहा लाख चाळीस हजार रुपयांचा ग्रामीण डाक विमा दि .१ मे २०१५ रोजी घेतला होता .त्यानी नियमित पणे हप्त्याचा भरणा करीत होते.
गेल्या दोन महीण्यापुर्वि जाधव यांचे दुर्दैवाने निधन झाले. दरम्यान ग्रामीण टपाल जिवण विमा धारक नरेंद्र जाधव यांची पत्नी वारस श्रीमती.अनुराधा नरेश जाधव यांनी विमा पाँलिसि ची रक्कम मिळावी म्हणून अर्ज केला होता .
नांदेड डाक विभागाचे डाक अधिक्षक श्री. शिवशंकर लिंगायत यांनी .देगलूर उप डाक विभागाचे डाक निरिक्षक एस एस नणिर यांना आदेश देऊन त्वरित विमा धारकांच्या वारसास रक्कम देण्यासाठी सांगितले. डाक निरिक्षक नणिर यांनी विलंब नकरता विमा साठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करून अवघ्या दोन महीण्यात मयत जाधव यांच्या पत्नी श्रीमती अनुराधा नरेंद्र जाधव यांना 8,25,600 आठ लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांचा धनादेश डाक निरिक्षक एस एस नणिर व पोष्टमास्तर एस एम शिंदे यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी सुपुर्द करण्यात आला.

ग्रामीण टपाल विमा धारकांच्या कुंटुंबास संकटकाळी विमा रक्कमेचा आधार मिळाल्याने त्यानिही डाक विभागाला धन्यवाद दिले असून समाधान व्यक्त केले आहे.