Home उत्तर महाराष्ट्र मध्यप्रदेश सरकार कडून प्रतिभा शिंदे यांचा सन्मान…!

मध्यप्रदेश सरकार कडून प्रतिभा शिंदे यांचा सन्मान…!

118
0

रावेर (शरीफ शेख)

मध्यप्रदेश सरकार व जन जोडो अभियान अंतर्गत राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरीय पाण्या वर कार्यशाळा घेण्यात आली त्यात महाराष्ट्र तून सामुदायिक वन हक्का मधे स्थानिकांचा सहभाग व त्यांचे अधिकार व त्यातून पाणी स्रोत आणि नैसर्गिक संसाधन यांचे नियोजन व व्यवस्थापन करण्याच्या अधिकाराबाबत प्रतिभा शिंदे (लोक संघर्ष मोर्चा) यांनी आपले पेपर प्रस्तुती करण केले व त्यांच्या ह्या कामा बद्दल मध्यप्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री पब्लिक हेल्थ व पर्यावरण मंत्री सुखदेव पानसे यांनी सन्मानीत केले मध्यप्रदेश सरकार पहिले राज्य ठरले ज्यांनी “जल का अधिकार (संरक्षण और सस्टें नेबल उपयोग )अधिनियम व नदी पुनरुज्जीवन कायदा बनवण्याचा निर्णय घेतला

ह्यात मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री मा.कमलनाथ राय यांच्या समोर प्रतिभा शिंदे यांनी बोलताना सांगितले की गावातील शेवटच्या माणसाला विकास म्हणजे नैसर्गिक संसाधनांची लूट नाही तर शेवटच्या माणसाला त्याच्या अधिकार सह सहभागी करून घेतले आहे. पाण्याच्या अधिकार बाबत आपण जेव्हा बोलतो तेव्हा गावातील लोकांना आपल्या पाण्याची संरचना व स्रोत यांच्या वरती अधिकार दिले पाहिजेत. असे वक्तव्य केले त्याच बरोबर पाणी पिण्या साठी पहिली प्राथमिकता दुसरी शेती व नंतर उद्योगांना प्राधान्य दिले पाहिजे ह्या वेळी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी महाराष्ट्रात सुरू असलेले जल साक्षरता केंद्र मध्यप्रदेश मधे सुरू करण्याची घोषणा केली व त्याच बरोबर त्यांनी ह्या कायद्या अंतर्गत गावातील पाणी संरचना मजबूत करण्या साठी गावात जल सहेली यांचे जाळ विणण्याची घोषणा केली.

Previous articleमुस्लिम मंच ४५ व्या दिवसाच्या उपोषणाला आनंदाची झालर
Next articleटपाल विमा विमा धारकाच्या वारसाला टपाल विभागाचा आधार..
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here