Home जळगाव मुस्लिम मंच ४५ व्या दिवसाच्या उपोषणाला आनंदाची झालर

मुस्लिम मंच ४५ व्या दिवसाच्या उपोषणाला आनंदाची झालर

70
0

आता तरी कायदा मागे घ्या- मुस्लिम मंच ची मागणी

रावेर – शरीफ शेख

जळगाव , दि. १२ :- मुस्लिम मंच तर्फे सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा मंगळवार हा पंचेचाळीसावा दिवस असल्याने व दिल्ली येथील निवडणुकांचा निकाल जाहीर होत असल्याने या भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा, एन आर सी व एनपीआर या कायद्याच्या विरोधाला एक वेगळीच बाजू होती.
आजच्या उपोषणात काट्या फाईल शनिपेठ येथील मलिक परिवाराचे व सालार परिवाराचे नेतृत्व लाभले होते.

काट्या फाइल येथील तरुण, वयस्कर लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता काट्या फाईल मशिद चे इमाम मौलाना अहद मिल्ली यांनी कुराण पठाणाने उपोषणाची सुरुवात केली.

*उपोषण स्थळी दिल्ली विधानसभेचे निकालाबाबत उस्तुकता व आन्दोस्तव*

पंचेचाळीसावा साखळी उपोषण सुरू असताना दिल्ली विधानसभेचे इलेक्शन हे शाहीनबाग, हिंदू-मुस्लीम, ३७० व पाकिस्तान या भोवतीच फिरत असल्याने आज त्या विधानसभेचा निकाल व त्याचे प्रसारण होत असताना उपोषणस्थळी सुद्धा आनंद व्यक्त होत होता या वेळी भिकन सोनवणे, मुकुंद सपकाळे ,फारुक शेख, गफ्फार मलिक, करीम सालार, डॉक्टर अमानुल्ला शाह, हाफिस अब्दुल रहीम, फिरोज मुलतानी, डॉक्टर रफिक काझी, एजाज मलिक, जुबेर मलिक, अझहर शेख ,शमीम बंगाली, अकील खान ,खलील अहमद, यांनी मार्गदर्शन केले यावेळी आत्माराम महाले, नदीम मलिक, अजित सालार ,आमीन बादलीवाला, डॉक्टर इक़बाल शाह, गुलाब फते महंमद, नजीर मुलतानी, इरफान सालार, रईस शालीमार, यांची विशेष उपस्थिती होती.
*महसूल अधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन*

एजाज मलिक यांच्या नेतृत्वात नवीद खान, हारून सय्यद, गुलाम हैदर ,फारूक अहेलेकार, इरफान सालार, सय्यद लियाकत, गुलाब फते मोहम्मद, इक्बाल पठान, खलील आहिलेकार, नाजीम खान फौजी यांनी महसूल अधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन दिले.

*उपोषण संपल्यावर आनन्दोस्तव व पेढ़े वाटप* उपोषणाची सांगता झाल्यावर करीम सालार, गफ्फार मलिक व फारुक शेख यांनी उपस्थित सर्व उपोषण आर्थी ना पेढे वाटप करून दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतील निकालाबाबत शाहीन बागच्या आई बहिणीचे कौतुक करून या विजयात त्यांचा मोठ्या प्रमाणात त्याग, बलिदान असल्याने त्यांचे कौतुक करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माननीय पंतप्रधान यांना विनंती करण्यात आली की की त्यांनी आतातरी सी ए ए हा कायदा मागे घेण्यात यावा किंवा त्यात संशोधन करून धर्म वगळावे तसेच 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या एम पी आर ला थांबवण्याचे आदेश द्यावे व भारतात यापुढे एन आर सी होणार नाही असे स्पष्ट लिखित आदेश द्यावे अशी एकमुखी मागणी मुस्लिम मंचाच्या वतीने करण्यात आली.