Home मराठवाडा माहेर आणि सासर कडील मंडळींमध्ये उत्कृष्ट समन्वय साधल्याने मीराचे ‘ खाकीवर्दीचे ‘...

माहेर आणि सासर कडील मंडळींमध्ये उत्कृष्ट समन्वय साधल्याने मीराचे ‘ खाकीवर्दीचे ‘ स्वप्न झाले पुर्ण

126

बनली जालना जिल्ह्यातील पहिली महिला बस चालक ..‌‌.जिल्हाभरात कौतुक.

लक्ष्मण बिलोरे घनसावंगी जालना

जालना , दि. १० :- जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र कोठाळा येथील सासर असलेली आणि परभणी जिल्हा जिंतूर तालुक्यातील कुर्हाडी गाव माहेर असलेली माहेरचे नाव मीरा गणेश इंजे आणि सासरचे नाव मीरा पांडुरंग साबळे या तरूणीने परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपले खाकी वर्दी मिळविण्याचे स्वप्न साकार केले मीराने या यशाचे श्रेय आई आणि पती पांडुरंग यांच्यामीराची जीवन कहाणी थरारक आहे ..‌‌.मीरा पाचवीत असताना वडिलांचे छत्र हरवले , मीरा एकटीच भाऊ नाही, बहीण नाही, घरातील कर्त्या पुरूष गेल्याने कुटुंबाचा भार मीराच्या आईवर पडला .. मोलमजुरी करून,पोटाला चिमटा देत आईने मीराला बारावी पर्यंत शिकविले आणि हात पिवळे केले …. घनसावंगी तालुक्यातील कोठाळा येथील मारोती आश्रृबा साबळे यांचा मुलगा पांडुरंग सोबत लग्न लावून दिले… मीराला शासकीय नोकरी करण्याची इच्छा होती.पोलिस व्हायचे होते . परंतु ‘ ‘ मराठा आरक्षण ‘आडवे येत होते , एक मराठी मुलगी धडपड करूनही यशस्वी होत नव्हती परंतु मीराने हार मानली नाही,आईने सांगितले ‘बेटा तु प्रयत्न करत रहा ,यश निश्चित मिळेल ‘ पाठीवर आईची थाप आणि सासरकडील मंडळींचे प्रोत्साहन मीराला स्वस्थ बसू देत नव्हते.सासरच्या लोकांनी मीराचे बीए पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आणि बस चालकाचा बैचबिल्ला काढून घेतला .२०१८-१९ च्या सरळसेवा भरतीसाठी मीराने अर्ज केला,मीरा त्यात पास झाली राज्य परिवहन महामंडळाच्या बसची चालक बनली , पोलिस ना सही बस चालकाची खाकी वर्दी मीराने मिळविली मीरा गणेश इंजे- साबळे ही जालना जिल्ह्यातील पहीली महिला बसचालक बनली . जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यात मीराचे सर्वत्र कौतुक होत आहे,कोठाळा गावात घरोघरी आनंद व्यक्त केला जात आहे.