Home पश्चिम महाराष्ट्र आपल्याच बहिणीच्या पती ला साल्याने मारून टाकले

आपल्याच बहिणीच्या पती ला साल्याने मारून टाकले

61
0

अमीन शाह

पुणे , दि. १० :- चिंचवडमध्ये मेहुण्यानेच आपल्या बहिणीच्या पतीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना घडली आहे. मोहन लेवडे असं मृत व्यक्तीचं नाव असून आरोपी विष्णु जगाडेला पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेम संबंधांमुळे मोहन विष्णुच्या बहिणीला सतत त्रास देत होता, याचा राग मनात ठेवत विष्णुने हे कृत्य केल्याचं समजतंय. महत्वाची गोष्ट म्हणजे ही घटना घडल्यानंतर आरोपीने स्वतः १०० नंबरवर फोन करत हत्येची कबुली दिली.
मोहन लेवडे यांचं त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते. यावरुन मोहन यांनी आपल्या पत्नीला मुलांना घेऊन तू माहेरी जा…यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. याचसोबत घटस्फोट घे यासाठीही मोहन विष्णुच्या बहिणीवर दबाव आणत होता. बहिणीने ही बाब आपला भाऊ विष्णुला सांगितली. बहिणीचा त्रास कमी होण्यासाठी विष्णू मोहन यांच्याशी चर्चा करण्यासाठी बहिणीच्या घरी गेला. विष्णु आणि मोहन यांच्यात रात्री उशीरापर्यंत दारुची पार्टीही झाली. यावेळी विष्णुने आपल्या दाजींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहन लेवडे यांनी विष्णुची एकही गोष्ट एकून घेतली नाही. या चर्चेचं रुपांतर भांडणात झाल्यामुळे संतापलेल्या विष्णुने मोहन यांच्यावर शस्त्राने वार केले , ज्यात त्यांचा मृत्यू