Home विदर्भ बोर्डी येथे ग्रामसभा पडली पार, 11 ही सदस्य व उपसरपंच यांची गैरहजेरी,लोकांनी...

बोर्डी येथे ग्रामसभा पडली पार, 11 ही सदस्य व उपसरपंच यांची गैरहजेरी,लोकांनी दाखवला नाराजीचा सुर

170

देवानंद खिरकर – बोर्डी

अकोला / अकोट , दि. ०३ :- तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी येथे 26 जानेवारी रोजी असलेली ग्रामसभा ही तहकूब ठेवण्यात आली होती.तरी आज दिनांक 03/02/2020 रोजी ग्रामसभा सकाळी 11.00 वाजता ग्राम पंचायत मधे तहकूब असलेली ग्रामसभा घेण्यात आली. बोर्डी मधे सर्व लोकसंख्या पाहता 4000 हजार आहे.परंतू यापैकी फक्त ग्राम सभेला आजरोजी गावातील 28 लोकांचीच उपस्थिती होती. यावेळी सर्वानुमते ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून संजय रामनाथ ताडे सरपंच बोर्डी हे होते.नंतर ग्रामसेवक मोहोकार साहेब यांनी ग्राम पंचायत ला सन 2015 ते सन 2019 परंत आलेल्या पुर्णनिधी बाबत व आलेल्या पुर्णनिधी मधुन करावयाचे असलेले गावातील पेंटीगकामे या बद्द्ल उपस्थीत असलेल्या ग्रामसभेतील लोकान समोर पूर्ण सविस्तर माहीती दिली.यामधे बोर्डी येथिल प्रतिस्ठीत नागरीक आनंदराव लाहोरे यांनी सरपंच व ग्रामसेवक बोर्डी यांचे समोर ग्राम सभा सुरु असतांना उभ राहून स्वताप्रश्न मांडला की आज रोजी ग्राम सभा सुरु आहे परंतू मी माझ्या पुर्ण आयुष्यामधे आजरोजी ही पहिली ग्रामसभा पाहीली की ग्राम सभेला ग्राम पंचायतचे निवडून आलेले 11 पैकी एकही ग्राम पंचायतचा मेंबर,सदस्य व उपसरपंच सुध्धा आजरोजी ग्रामसभेला हजर नाहीत.ही आचर्यांची बाब आहे.कारण निवडून आलेले वार्ड मेंबरच जर ग्रामसभेला हजर नाहीत तर मग लोकांनी आपआपल्या वार्डातील समस्या मांडाव्या कूनाकडे ही फार दुखाची बाब आहे.या बाबत ग्रामसभेला उपस्थित असलेल्या गावातील लोकांनी पुर्णपणे नाराजी व्यक्त केली.नुसते ग्राम पंचायत मधे बोर्डवर सदस्य म्हणून फक्त नावाचा मोठेपणा करिता ही ग्राम पंचायत बोर्डीची बॉडी असल्याचे लोकान मधुन जोरदार चर्चा आज रोजी ग्राम सभेमधे एकावयास मीळाली.यामुळे बोर्डी ग्राम पंचायतचा पुन्हा भोंगळ कारभार हा आजरोजी ग्रामसभे मधे पहावयास मिळाला आहे. बोर्डी ग्राम पंचायत ला सन 2015 ते सन 2019 परंत जवळपास 45 लाख रुपये निधी मीळालेला आहे.व तो पुर्ण निधी ग्राम पंचायत बोर्डी कडे आजरोजी सुध्धा व्याजासहित जमा आहे.तरी सुध्धा या निधी मधुन आज रोजी कुठलेही कामे गावात करण्यात आलेली नाही.बोर्डी ग्राम पंचायत मधे सर्व ,,हम करेसो कायदा,,हा प्रकार सुरु आहे. तरी या गंभीरप्रकरणाकडे वरिस्ठ अधिकारी यांनी लक्ष देने गरजेचे आहे.व दखल घेवून बोर्डी ग्राम पंचायतचा हा सुरु असलेला भोंगळ कारभाराची लवकरात लवकर चौकशी करुन सबंधीतावर कारवाई करने गरजेचे आहे.

तरी आता वरिस्ठ अधिकारी काय दखल घेतात याकडे संपुर्ण बोर्डी ग्रामवाशीयांचे लक्ष लागले आहे.यावेळी आज ग्रामसभेला उपस्थित ग्रामसेवक मोहोकार,सरपंच संजय ताडे,तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गये,पत्रकार देवानंद खिरकर,हीरालाल जयस्वाल,आनंदराव लाहोरे,अरुण सोळंके,अनिल राऊत,राजू राऊत,सुनिल राऊत,सचिन अंबळकार,राजू वाघमारे,ओमप्रकाश देशमुख,महादेव भामोदकार,शामनाथ नाथजोगी,सुनिल पडघाम,विलास चेडे,प्रभुदास कोंडे,निलेश कवळे,मुबारक अली,दिपक देशमुख,मनोहर धर्मे ,विलास भालतिडक,दादाराव सोनोनो,आदी लोकांची उपस्थिती होती.