देवानंद खिरकर
अकोट , दि. ०३ :- सततची नापिकी , दुष्काळी परिस्थिती , अतिवृष्टी , ओला दुष्काळ,बैंकेच्या कर्जाची परतफेड,सावकारी कर्ज ईत्यादीमुळे विदर्भातील शेतकर्याच्या आत्महत्येचा आलेख सतत वाढतच आहे.विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सावकार ग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खालील महत्वाच्या मागण्या वजा सुचना विचारात घेऊन त्यांना न्याय द्यावा.
ज्या ज्या अवैध सावकाराने सावकारग्रस्त शेतकर्याच्या जमीन हडप करुन स्वताच्या नावे 7/12 केला परंतू त्या जमिनीचा ताबा सावकार ग्रस्त शेतकर्यानकडे आहे.अशा जमिनी सरकार च्या नावे करण्यात येवुन पिक नुकसानीचे अनुदान सावकाराला न देता जमीन ताब्यात असलेल्या शेतकर्यांना देण्यात यावे.
महाराष्ट्र सावकारी अधिनियम (नियमन) 2014 च्या कायद्यानुसार ज्या ज्या सावकार ग्रस्त शेतकर्याकडुन ए आर,डी डी आर,यांचे कडुन निकाल लागला .परंतू सावकारांनि उच्च न्यायालयात अपिल दाखल केले सावकारी पाशात हडप केलेल्या शेतजमिनीच्या पिकाचा पैसा न्यायालयात लावुन हवालदिल सावकार ग्रस्त शेतकरी पैशा अभावी मस्तवाल सावकाराशी टक्कर घेऊ शकत नाही. अशा सावकार ग्रस्त शेतकर्याच्या पाठीशी शासनाने स्वखर्चाने वकील उभा करावा.
सावकारी कायद्याची काल मर्यादा वाढवावी .त्या काल मर्यादा बाहेरील न बसलेली प्रकरणे विशेस बाब म्हणून डी डी आर व ए आर यांना तसे हक्क प्रदान करुन चालविंण्याचे आदेश व्हावे.
डी डी आर व ए आर कडे प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत व सावकारांना पाठीशी घालणार्या डी डी आर व ए आर वर कडक कारवाई करण्यात यावी.
प्रत्येक जिल्ह्यातून सावकार ग्रस्त शेतकरी समितीचा प्रतिनिधि शासनाच्या दक्षता समितीत ,अशासकिय सदस्य , ज्या ज्या सावकार ग्रस्त शेतकर्यांना डी डी आर व ए आर यांनी ,सावकारी कर्ज मूक्तता प्रमाणपत्र,दिले त्यांना त्यांच्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा 7/12 त्यांचया नावावर करण्यात यावा.
या सावकार ग्रस्त शेतकर्याच्या जिवन मरणाचा अत्यंत महत्त्वाच्या मागण्या असुन आपण राज्याच्या दक्षता समितीच्या अध्यक्षा या नात्याने व सावकारी कायद्याच्या गाढ्या अभ्यासक व सावकार ग्रस्त शेतकर्याच्या प्रश्नाची जाण असलेल्या नेत्या असल्यामूळे आपण गांभीर्य पूर्वक लक्ष घालुन सावकार ग्रस्त शेतकर्याच्या पाठीशी उभ्या राहाल अशा आसयाचे निवेदन दिले आहे.
निवेदन देतेवेळी रमेश रामचंद्र खिरकर , रामभाऊ जटाळे,विनोद गहेरवार,गणेश माथनकर,रेखा चौधरी,सुनिता ताथोड़,रामदास झाडे पाटील,रवि ठाकरे,डीगांबर पाटील,सुखदेव मुरकुटे,शिवाजी वायाळ,गजानन इंगळे,संतोष बोडखे,उषाबाई शिंदे,देवकृष्ण महल्ले,सुरेश नारे, सुरेश कराळे,लक्ष्मण गुरेकार,भीमराव सुखदेव भदे, रमेश गवई,उकर्डा अवधूत इंगळे,अरुन श्रीराम पजई,आदी शेतकर्याच्या सह्या आहेत.