Home जळगाव मुस्लिम मंचचे ३८ व्या दिवशी उपोषण सुरूच , पिंप्राळा हुडको व...

मुस्लिम मंचचे ३८ व्या दिवशी उपोषण सुरूच , पिंप्राळा हुडको व असोदा येथील तरुणांचा सहभाग…!

146

शरीफ शेख

रावेर , दि. ०३ :- जळगाव जिल्हा मुस्लिम मंच तर्फे भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा सोमवार अडतिसावा दिवस पिंप्राळा हुडको व असोदा येथील तरुणांच्या सक्रिय सहभागाने विरोध नोंदविण्यात आला.

हाफिज मोहम्मद शाहिद यांच्या कुराण पठाणाने उपोषणाला सुरुवात झाली यावेळी सचिन सोनवणे, भोजराज सोनवणे, डॉक्टर रागीब जागीरदार ,करीम सालार, गफ्फार मलिक ,आसिफ खान ,मुकुंद सपकाळे ,फारुक शेख, आसिम शेख ,आयाज अली, शरीफ शाह बापू ,डॉक्टर अमानुल्ला शाह, मौलाना जाकिर हुडको, फिरोज मुलतानी ,अल्ताफ हुसेन शेख, शेख शोएब, वसीम शेख, अश्फाक पिंजारी, आदिल अहमद, यांनी उपोषण आर्थी सोबत संवाद साधला.

असोदा येथील मुशीर शेख, जाकिर अहमद ,भोजराज सोनवणे,इम्तियाज़ रंगरेज, रहीम पैलवान तर हुडको तर्फे हे शेख फारूक भिकारी ,फिरोज खान, ताहेर पिंजारी, कमरुद्दीन पिंजारी, मतीन पिंजारी आदींनी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना निवेदन दिले.

या ३८ व्या दिवसाच्या उपोषणाचे नेतृत्व हुडको पिंपळाचे शिवसेनेचे नगरसेवक जाकिर पठाण यांनी तर असोदयाचे न
मोहसिन शेख व मुशीर शेख यांनी नेतृत्व केले. उपोषणाची सांगता मौलाना जाकिर हुडको यांच्या दुवा ने करण्यात आली.