
नांदेड / देगलूर दि.3 :- ( राजेश भांगे) ;- देगलूर शहरातील पाव्हर हावुस समोरील खाजगी दवाखान्याचे सांड पाणी रस्त्यावर येवुन साचत असल्याने परीसरात डासांचा प्रादुर्भाव होवुन स्थानिक नागरिकांच्या आरोग्या वर हानिकारक परिणाम होत असल्याची तक्रार नाटकर गल्लीतील नागरिकांनी न. पा. मुख्याधिकारी देगलूर यांच्या कडे केली.
देगलूर – उदगीर रोडवरील पाव्हर हावुस समोर डॉ. बल्लुरकरांचे रूग्णालय असुन त्याच रूग्णालयातील सांड पाणी पंचायत समितीच्या भिंती पासुन नाटकर गल्ली कडे जाणाऱ्या रस्त्यावर येत आहे या दुषित सांड पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरत आहे तरी या संर्दभात येथील नागरीकांनी अनेक वेळा नगर पालिकेच्या ई-मेलवर देवुनहि न.पा. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्या विषयावरील तक्रारी ची अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने त्रस्त नागरिकांनी न.पा.मुख्याधिकारी देगलूर यांना भेटून लेखी तक्रार दिली असुन लवकरात लवकर डॉं.बल्लुरकर यांच्या रूग्णालयातुन येणाऱ्या दुषित सांड पाण्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी येथील नागरिकांनी तक्रारी व्दारे केली आहे व तात्काळ प्रतिबंध न केल्यास या घटनेची तक्रार वरिष्ठ अधिकारीं कडे करण्याचा ईशारा या तक्रार अर्जा व्दारे देण्यात आहे . या तक्रार अर्जावर यादवराव पाटिल, हणमंत वारलवार,मष्णाजी कोनगुलवार , मष्णाजी लालन्ना , माधव गंगाराम, सायलु बोगुलवार,आदि नागरिकांच्या सह्या आहेत .











































