Home मराठवाडा जिल्हा रुग्णालय परिसरात दोन दिवसा पासून मृतदेह पडला बेवारस..!!

जिल्हा रुग्णालय परिसरात दोन दिवसा पासून मृतदेह पडला बेवारस..!!

121

सय्यद नजाकत – बदनापूर

जालना , दि. ०३ :- जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर कालपासून एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडून आहे. मात्र याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. हा मृतदेह एका भिकाऱ्याचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन तीन दिवसांपासून ही व्यक्ती रुग्णालयाच्या परिसरात फिरत होती.

मात्र रात्रीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र अद्याप या मृतदेहाकडे कोणत्याही पोलीस कर्मचारी किंवा डॉक्टर अधिकारी फिरकले नाहीत. त्यामुळं आरोग्य मंत्र्यांच्याच जिल्ह्यात अशा प्रकारे जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार सुरु असल्याचं चित्र समोर आलं आहे.