Home सातारा माण मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

माण मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

156

अध्यक्षपदी दिलिपराज कीर्तने तर सचिवपदी आकाश दडस ,उपाध्यक्ष अहमद मुल्ला उपाध्यक्ष योगेश गायकवाड निवड

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. ०३ :- माण मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये अध्यक्षपदी दिलीप कीर्तने सचिवपदी आकाश दडस उपाध्यक्ष अहमद मुल्ला उपाध्यक्ष योगेश गायकवाड खजिनदार सुशील त्रिगुणे कार्याध्यक्ष विजय ढालपे जिल्हा प्रतिनिधी अशोक हांडे सहसचिव केराप्पा काळेल यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या आहेत.

दि (२) फेब्रुवारी रोजी माण मराठी पत्रकार संघाची बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह म्हसवड येथे पार पाडण्यात आली यावेळी माण मराठी पत्रकार संघाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या सर्वांमध्ये माण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप कीर्तन तर सचिवपदी आकाश दडस बिनविरोध निवड करण्यात आलेल्या आहेत .माण तालुक्यातील पत्रकार दुष्काळाच्या बातम्या सातत्याने वार्तांकन करत असतात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही एकत्र येऊन काम करणार आहे पत्रकारांना योग्य मानधन मिळवण्यासाठी पत्रकारांचा एकत्रित लढा उभा राहणार आहे असे मत माण तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव बनसोडे यांनी केले.

यावेळी संस्थापक पोपट बनसोडे,
ज्येष्ठ पत्रकार राजेश इनामदार,अजित काटकर ,अजित कुंभार ,सागर बाबर ,विजय भागवत ,शिवशंकर डमकले ,जयराम शिंदे ,विशाल माने, राजेंद्र केवटे ,धनंजय पानसांडे सिद्धार्थ सरतापे आदी तालुका पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष दिलीपराज कीर्तने म्हणाले की ही संघटना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार असून ग्रामीण भागातील मराठी पत्रकार यांच्या न्यायासाठी कार्यरत राहणार आहे . माण तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव आकाश दडस म्हणाले की सर्वसामान्य सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी व परिसरातील अन्यायग्रस्त नागरिकांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासन दरबारी आवाज उठवण्याचे काम करणार असून सर्वसामान्यांच्या अडचणी सदैव माण तालुका पत्रकार संघ सदैव तत्पर असल्याचे ग्वाही यांनी दिली .यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची विधानपरिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील ,राज्यमंत्री शंभूराज देसाई माण खटावचे आमदार जयकुमार गोरे,शिवसेना नेते शेखर गोरे, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, देशमुख माणदेशी महिला बँक संस्थापक अध्यक्ष चेतना सिन्हा ,रणजित देशमुख यांनी आभिनंदन केले.