Home मराठवाडा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठा ची जागा बस स्थांनका साठी द्या  – भाऊ...

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठा ची जागा बस स्थांनका साठी द्या  – भाऊ साहेब घुगे

22
0

सययद नजाकत

जालना / बदनापूर , दि. ०३ ;- सत्तावीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बदनापूर बसस्थानकासाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाची दोन एक्कर जागा हस्तांतरित करून प्रश्न सोडवावा अशी मागणी जालना जिल्हा युवा सेना प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना एका निवेदनाद्वारे केली आहे .

बदनापूर तालुका अस्थितवात येऊन सत्तावीस वर्ष उलटले आहेत,तालुक्याचे ठिकाण असल्याने दररोज ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येवर तालुक्याच्या ठिकाणी येतात मात्र बस स्थानक नसल्याने रात्री बस सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो तसेच शहरातील व्यापाऱ्यांना खरेदी साठी मुंबई,पुणे,सुरत,अहमदाबाद आदि शहरात जावे लागते मात्र या ठिकाणी बस स्थानक नसल्यामुळे बसेस थांबत नाही व प्रवाश्यांना औरंगाबाद ,जालना खासगी वाहनाने गाठावे लागते.

बदनापूर तालुका अस्थितवात येऊन सत्तावीस वर्ष उलटले असतांना देखील बस स्थानक प्रश्न सुटलेला नसल्यामुळे प्रवास्यांचे अतोनात हाल होत आहे परंतु लोक प्रतिनिधी केवळ आश्वासन देऊन मोकळे होतात ,जागेअभावी प्रश्न प्रलंबित असल्याने परभणी वसंतराव कृषी विद्यापीठाची बदनापूर येथे जालना औरंगाबाद महामार्ग रस्त्यावर तीनशे एक्कर जमीन असून बीज प्रक्रिया केंद्र बंद पडलेले आहेत त्या ठिकाणी बसस्थानक होऊ शकतो त्यासाठी किमान 2 एक्कर जागा बसस्थानक साठी हस्तांतरित करून बस स्थानक प्रश्न सोडवावा अशी मागणी भाऊसाहेब घुगे यांनी केली आहे .