जळगाव

डंपर आणि क्रूझरमध्ये भीषण अपघात , १० जणांचा मृत्यू

Advertisements

पोलीसवाला टीम

जळगाव , दि. ०३ :- एक लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना एकाच कुटुंबातील या लोकांवर काळाने घाला घातला.

एक डंपर आणि क्रूझर जीपची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील फैजपूर रस्त्यावर घडली आहे. ज्या लोकांचा या अपघातात बळी गेला आहे ते एका लग्न समारंभाहून घरी परतत असताना रविवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली.
सुत्रांच्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील यावल-फैजपूर रस्त्यावरील हिंगोणे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृत्यू पावलेले लोक हे चौधरी आणि महाजन कुटुंबातील आहेत. ते एकमेकांचे नातेवाईक असून चोपडा येथून एक लग्न समारंभ आटोपून क्रूझर जीपमधून घरी येत असताना ही दुर्घटना घडली. डंपर आणि क्रूझरची समोरासमोर भीषण धडक झाल्याने क्रूझरचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...