मराठवाडा

देगलूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणी साठि चिंतन बैठक संपन्न.

Advertisements

नांदेड / देगलूर , दि. ०३ ( राजेश भांगे ) – देगलूर येथे गांधी चौक मध्ये 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या जाहिर चिंथन बैठकि च्या वेळी नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते व शहरातील सामाजिक संघाटनेच्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले व देगलूरला जिल्हा करण्यासाठी सघंर्ष समिती गठित करून मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या माध्यमातून लढा देण्याचा इशारा देण्यात आला . सदरील कार्यक्रमाच्या बैठकीची सुरवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सदर या बैठकीस शहरातील शेकडो नागरिक व नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरी याच विषया संदर्भात उद्या सकाळी ठीक 11 वाजता नांदेड जिल्ह्याधीकारी साहेबांनी शिष्ट मंडळास भेटण्यासाठी वेळ दिलेला आहे . पुन्हा एकदा मंगळवारी सायंकाळी ठीक 7 वाजता गांधी चौक येथे आंदोलनाची पुढील दिशा कशी असावी या साठी व्यापक बैठक बोलवण्यात येणार आहे यावेळी अशोक कांबळे यांनी याठिकाणी येण्याचे आव्हान केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी जावेद अहमद , हणमंत पंडीलवार , ऋषीकेश बनसोडे, योगेश जाकरे , चंदू आक्केमवार, यांनी मेहनत घेतली .

तसेच या वेळी अनेक सामाजीक सघटणांनी व पत्रकार मंडळींनी पाठींबा दिला व देगलूरा ला जिल्हा करण्याच्या मागणी साठी मोठ्या संख्येने हजेरी लावली.तरी या वेळी प्रास्तविक अशोक कांबळे यांनी व आभार व्यक्त विकास नरबाग यांनी केले.

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...
मराठवाडा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना – मागील पंधरवड्यात तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील ...
मराठवाडा

कच्छवेज‌ गुरुकुल स्कुलच्या विधार्थाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

नांदेड ( प्रशांत बारादे) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या तर्फ घेण्यात येणाऱ्या पूर्व ...