Home विदर्भ बापानेच आपल्या लाडक्या मुलास मारून टाकले

बापानेच आपल्या लाडक्या मुलास मारून टाकले

112
0

अमीन शाह

अकोला , दि. ०३ :- जन्मदात्या बापाने मुलावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी अकोल्यात घडली. बाबा भारती असे वडीलाचे नाव असून, त्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मुलगा मनिष भारती हा जागीच ठार झाला. गोळीबाराच्या या थराराने अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.
सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्राणी मतिमंद शाळेजवळ असलेल्या ब्रम्हांडनायक अपार्टमेंट मध्ये मनीष भारती यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये तो सोमवारी दुपारी बारा वाजता असताना त्याचे वडील बाबा भारती यांनी मनीष वर गोळी झाडून त्याची हत्या केली.

मनीष भारती हा त्याचे वडील बाबा भारती यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या बेतात होता, अशी माहिती समोर येत आहे. मनिष भारती याच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी बाबा भारती यांनी त्याच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात मनिष भारती यांचा जागेवरच मृत्यू झाला, असे पोलिसांकडून समजले आहे. घटनेची वार्ता कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व बाबा भारती यांना ताब्यात घेतले. वृत्त लिहीस्तोवर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल .

Previous articleदेगलूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणी साठि चिंतन बैठक संपन्न.
Next articleदप्तर तपासणीतून भ्रष्ट कारभार होणार उघड
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here