Home विदर्भ इनस्पायर अवार्ड राज्यस्तरीय प्रदर्शनी करिता 17 प्रयोगाची निवड.

इनस्पायर अवार्ड राज्यस्तरीय प्रदर्शनी करिता 17 प्रयोगाची निवड.

119

वाशीम जिल्ह्यातुन १७ प्रतिकृती राज्यावर जाणार

अकोला , बुलढाणा व वाशिम जिल्ह्यतून 180 बालशास्त्रज्ञानाचा सहभाग

कारंजा प्रतिनिधि

कारंजा , दि. ०२ :- विद्या प्राधिकरण नागपूर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, जि. प. वाशिम, शिक्षण विभाग पंचायत समिती कारंजा,विज्ञान अध्यापक मंडळ, वाशिम व ब्लू चिप कॉन्वेंट व ज्युनि.कॉलेज अॉफ सायन्स कारंजा यांचे संयुक्त विद्यमाने ब्ल्यु चिप कॉन्व्हेंट कारंजा येथे दि.३० जानेवारी ते १ फेब्रुवारी पर्यंत अकोला,बुलडाणा व वाशीम जिल्ह्यसाठी जिल्ह्यस्तरीय इन्सापायर अवॉर्ड प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.यामधुन 17 प्रकल्पाची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे.
समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन कारंजा पंचायत समिती सभापती सविता रोकडे तर प्रमुख अतिथी जिल्हा परिषद वाशिमचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे,एस. एस.एस. के.इन्नानी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पि.आर.राजपुत, एन.आय.एफ.चे समन्वयक विशाल वाघमारे, शिक्षण उपनिरीक्षक आकाश आहाळे,अकोला माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, कारंजाचे गटशिक्षणाधिकारी सु.म.अघडते,विज्ञान अध्यापक मंडळाचे विभागिय अध्यक्ष डॉ.रविंद्र भास्कर,उपाध्यक्ष विजय भड,अकोला विज्ञान अध्यापक मंडळाचे प्रतिनिधी धम्मदिप इंगळे,डॉ. आर.सी मुकवाने आदि मान्यवर उपस्थित होते.
शिक्षका मधून सुरेखा माकोडे, विद्यार्थ्या मधून विनोद कोंडे व भाग्यश्री गावंडे यांनी प्रदर्शनीच्या आयोजना बाबत मनोगत व्यक्त केले.त्यानंतर उपस्थित मान्यवारांनी यथोचित मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
अकोला जिल्ह्यातुन 5 बुलडाणा जिल्ह्यातुन 3 व वाशीम मधुन 9 अश्या एकूण 17 विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली. अकोला व बुलडाणा जिल्ह्यासाठी परीक्षक म्हणुन प्रा.आर.सी.मुकवाने व प्रा. आर.ए.पाटिल तर वाशीम जिल्ह्यासाठी आर.एल.टी महाविद्यालय अकोलाचे प्रा.डॉ.पूनम अग्रवाल व प्रा.डॉ.आर.डी चौधरी यांनी काम पाहिले.
सदर प्रदर्शनीमध्ये अकोला जिल्हा 54, बुलडाणा जिल्हा 32 वाशिम जिल्ह्यातुन 94 अशा एकून १८० प्रतिकृतीची मांडणी करण्यात आली होती.
वाशीम जिल्हा व कारंजा तालुका अध्यापक मंडळाचे सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. अकोला जिल्हयातुन ओम श्याम बावनेर,सोपान पिलात्तर,सार्थक कुचर,पुजा कडु, मथुरा पोधाडे, बुलडाणा जिल्ह्यातुन आर्यन चापाइतकर, किमया बुधवानी, गौरव हिवाळे व वाशिम जिल्ह्यातुन शेख अहकण,अाचल मुंदे,अंकुश भागवत, तन्मय गोपाल खाडे, रोशन लांभाडे, मिताली मालपानी, कार्तिक मड्डी,प्रतिक भिसे व रोहित पाठक याच्या प्रतिकृतीची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन करता झालेली आहे. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला.राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन 8 ते 10 फेब्रूवारी पर्यन्त सिपना इंजिनिअरींग कॉलेज,अमरावती येथे होणार आहे. समारोपीय बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचलन स्नेहल गावंडे यांनी तर आभार संतोष गिर्‍हे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला तिनही जिल्ह्यातील बहुसंख्य बालवैज्ञानिक व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.