Home जळगाव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या फैजपूर शहर अध्यक्षपदी पत्रकार राजू तडवी यांची...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या फैजपूर शहर अध्यक्षपदी पत्रकार राजू तडवी यांची निवड

99
0

शरीफ शेख

रावेर , दि. ०२ :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या फैजपूर शहर अध्यक्षपदी पत्रकार राजू तडवी यांची निवड दि.२८ जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्यातील सर्वाधिक पत्रकार सभासद असलेला पत्रकार संघ आहे. पत्रकारांच्या न्याय व हक्कासह सामाजिक उन्नत्ती साठी सदैव कटिबद्ध असलेला संघ म्हणून पत्रकार संघाने ओळख निर्माण केली आहे. राज्यातील प्रत्येक शहरात, खेड्यात पत्रकार संघांचे काम पोहचले आहे. हे काम अविरत सुरु राहावे म्हणून व फैजपूर सारख्या एतेहासिक शहरात पत्रकार संघाच्या माध्यमातून काम व्हावे म्हणून पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मार्गदर्शनाने राजू तडवी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी बाबत जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, वृत्त वाहिनी विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, वृत्त वाहिनी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष ढिवरे यांनी अभिनंदन केले आहे.