Home विदर्भ शहर वाहतूक शाखेच्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचा वेगाने वाहन चालविणाऱ्यां नी घेतला धसका।...

शहर वाहतूक शाखेच्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचा वेगाने वाहन चालविणाऱ्यां नी घेतला धसका। एक महिन्यात तब्बल 658 वाहनांवर कारवाई

121

कुशल भगत

अकोला / आकोट , दि. ०२ :- आपल्या देशात साधारणपणे दर वर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोक मृत्यू मुखी पडतात, जखमी होणाऱ्यांची संख्या कितीतरी अधिक आहे, त्या पैकी काही लोकांना कायमचे अपंगत्व येते, रस्ते अपघाताला अनेक बाबी कारणीभूत असल्या तरी वेगाने वाहन चालविणे हा अपघात घडण्यासाठी एक प्रमुख कारणं असल्याचे सर्वक्षणा मध्ये समोर आले आहे.

त्यासाठी प्रत्येक मार्गावर किती वेगाने वाहन चालवावे ह्याची वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, परंतु वेगाची नशा एकदा डोक्यात गेली तर वेगावर नियंत्रण राहत नाही व त्यातूनच गंभीर अपघात घडतात व हकनाक लोक मृत्युमुखी पडतात ह्यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे, हे टाळण्यासाठी वेगात जाणाऱ्या वाहनाच्या वेगाचा अचूक वेध घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगाचा वेध घेणारी स्पीडगन असणारे एक नवेकोरे वाहन राज्य शासनाने महामार्ग पोलीस व शहर वाहतूक विभागाला पुरविले ह्या अत्याधुनिक इंटर सेप्टर वाहनाचा पुरेपूर उपयोग अकोला शहर वाहतूक शाखेने करून पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी जानेवारी महिन्यात धडक कार्यवाही करून एकाच महिन्यात तब्बल 658 वाहनांवर कार्यवाही केली, आज परिस्थिती ही आहे की इंटरसेप्टर वाहन महामार्गावर दिसताच वाहन चालक कार्यवाही टाळण्यासाठी वाहनाचा वेग हळू करतांना दिसत आहेत. आपली वाहने घालून दिलेल्या वेग मर्यादेतच चालवून संभाव्य अपघात टाळावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वाहन चालकांना केले आहे.