Home विदर्भ अस्तित्वात नसलेला वाळूसाठा जप्त दाखवुन जाहीर लिलाव करणार्या तहसिलदारासह संबंधीत कर्मचार्यांना निलंबीत...

अस्तित्वात नसलेला वाळूसाठा जप्त दाखवुन जाहीर लिलाव करणार्या तहसिलदारासह संबंधीत कर्मचार्यांना निलंबीत करा –  भाऊसाहेब बावने

24
0

अमीन शाह

नांदुरा , दि. ०२ :- अस्तित्वात नसलेला वाळूसाठा जप्त दाखवुन जाहीर लिलाव करणार्‍या तहसिलदारासह संबंधीत कर्मचार्‍यांना निलंबीत करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी तक्रार जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे भारतीय जन सम्राट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विर्दभ मतदार चे बुलडाणा आवृत्ती संपादक भाऊसाहेब बावने यांनी केली असुन या प्रकरणाची चौकशी करण्याचे तातडीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत चौकशीच्या भितीने तहसिलदार राहुल तायडे हे आजारी रजेचा बहाणा करीत सुट्टीवर गेले होते परंतु जिल्हाधिकारी यांनी त्यांची सुट्टी रद्द केली आहे.

जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे की, दिनांक 28 जाने 2020 रोजी तहसीलदार यांचे कक्षात सकाळी 11 वाजता, मौजे वळती बु,येथील पुलाजवळ 220 ब्रास व वसाडी बु,येथील पुलाजवळ 270 ब्रास अस्तीत्वात नसलेला रेतीसाठा परंतु फक्त कागदपत्री जप्त दाखविण्यात आलेल्या रेतीसाठ्याचा जाहीर लिलाव चालू असल्याचे कळताच तिथे जाऊन चौकशी केली असता असे आढळून आले कि मौजे वळती बु व वसाडी बु येथील रेतीसाठा नमुद केलेल्या ठिकाणी कुठलाही रेतीसाठा अस्तित्वात नाही सदर नदीपात्रात वाळूच नसल्याने कित्येक वर्षांपासून तो स्पॉट हर्रासच झालेला नाही. या संदर्भात तहसीलदार राहुल तायडे यांना प्रत्यक्ष भेटुन आपण अस्तित्वात नसलेल्या रेतीसाठ्याचा बनावटी लिलाव केला असुन माझ्या समक्ष प्रत्यक्ष घटनास्थळी येवुन रेतीसाठा दाखविण्या बाबत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर मलकापुरचे उपविभागीय अधिकारी यांना घटने बाबत दुरध्वनी वरुन माहीती देवुन प्रत्यक्ष स्थळनिरक्षण करण्या बाबत सुचित केले नंतर मनसेचे शहर अध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ तसेच गावातील नागरीक यांना सोबत घेऊन रेतीसाठा असलेल्या जागेचे स्थळ निरीक्षण केले असता परिसरातील 3 ते 4 गावातसुद्धा रेतीसाठा आढळून आला नाही. तेथील गावकर्‍यांशी चर्चा केली असता अश्याप्रकारचा कुठलाही रेतीसाठा अस्तित्वात नाही आणी या पुर्वीही कधीच नव्हता असे सांगत संपूर्ण नदीपात्रात पाणीच असल्यामुळे वाळूसाठा आला कोठून असा जवाब गावकर्‍यांचा ऑन व्हिडीओ रेकॉड केला आहे.या गंभीर घटने बाबत लगेचच निवासी जिल्हाधिकारी पुरी साहेब यांचेशी दुरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी तहसीलदार नांदुरा यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले, परंतु दि 28 जाने रोजी तक्रारकर्ते व गावकरी प्रत्यक्ष सायंकाळी 6 वाजेपर्यंत पंचनाम्या करीता तहसिल चे अधिकारी येणार म्हणुन घटनास्थळावर प्रतिक्षा केली परंतु निवासी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे नांदुरा तहसिलमधुन कोणीही पालन करीत नसल्याचे पाहता मा.जिल्हाधिकारी महोदया यांना दुरध्वनी वरुन माहीती देण्यात आली असल्याची तक्रारीत नमुद आहे तसेच सदर प्रकरणा बाबत जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दि 29 जाने रोजी रितसर तक्रार देण्यात आली तसेच या प्रकरणात दोषी असलेले नांदुरा तहसीलदार ,मंडळ अधिकारी, तलाठी व रेतीसाठा प्रमाणीत करणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी आणी खोट्या पंचनाम्यावर स्वाक्षरी करणार्‍या सर्व संबंधीतांची तात्काळ प्रभावाने चौकशी करण्यात येवुन शासनाची फसवणुक करणार्‍या भ्रष्ट कर्मचारी व अधिकारी यांना सेवेतुन निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली.तसेच तातडीने रेतीसाठा आढळुन आल्या बाबतच्या स्थळाचे निरक्षन करुन पंचनामा करतांना तक्रारदार यांच्या समक्ष पंचनामा करण्याची विनंती करण्यात येवुन वाळूमाफिया यांचे आर्थिक संगणमताने हा सर्व अवैध कारभार येथे बेलगामपणे वारंवार सुरु असल्यामुळे नांदुरा तालुक्यातील रेती वाहतुकीस संपुर्णत: बंदी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असुन या तक्रारीच्या प्रतिलीपी मा.मुख्यमंत्री,महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,आ.राजेश एकडे,आयुक्त महसुल अमरावती ,उपविभागीय अधिकारी मलकापुर यांना देण्यात आल्या आहेत.

Unlimited Reseller Hosting