Home मराठवाडा किनवट जिल्हा निर्मितीसाठी नाईकांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व मुख्यमंत्र्याचे सचिव...

किनवट जिल्हा निर्मितीसाठी नाईकांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व मुख्यमंत्र्याचे सचिव घागरा ने यांची भेट

630

राजेश भांगे

नांदेड / किनवट , दि. ०२ :- 22 नव्या जिल्ह्याची आणि 49 नव्या तालुक्यांची निर्मिती करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत मोठ्या जिल्ह्याचं विभाजन आणि विभाजन करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील एका समितीने ठेवला आहे त्यामुळे लवकरच राज्यात नवे जिल्हे आणि तालुक्यांची भर पडणार असल्याने मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या किनवट जिल्हा निर्मितीसाठी आज दिनांक 30 रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्र्यांचे सचिव व अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार प्रदीप नाईक यांनी भेट घेऊन चर्चा केली.
मांडवी इस्लापूर तालुके व किनवट जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी मागील कित्येक वर्षे आंदोलन धरणे करण्यात आले आहे गतवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला किनवट जिल्हा निर्मितीची घोषणा होईल अशी चर्चा चालली होती मात्र ती केवळ चर्चाच ठरली असून घोषणा काही झाली नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन बावीस जिल्हा निर्मितीचे संकेत दिल्यानंतर आता पुन्हा ही मोहीम सुरू झाली असून आज 30 जानेवारी रोजी होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थिती मधील मराठवाडा नियोजन बैठकीपूर्वी किनवट माहूर चे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मुख्यमंत्र्याचे सचिव घाग राणे यांची भेट घेऊन भौगोलिक माहिती देत आदिवासी व नक्षलग्रस्त भाग असल्याने व जिल्ह्याचे ठिकाण 150 किमी पेक्षा जास्त असल्याने किनवट जिल्हा निर्मिती करण्यात यावी यासाठी निवेदन दिले व चर्चा केली यावेळी जिपचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल पाटील कराळे बंडू राहून नाईक यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.