Home महत्वाची बातमी आहो आपल्या तहसिलदार मॅडम हिरोईनच दिसतात – माजी मंत्री बबनराव लोणीकर

आहो आपल्या तहसिलदार मॅडम हिरोईनच दिसतात – माजी मंत्री बबनराव लोणीकर

235
0

सययद नजाकत

जालना , दि. ०२ :- भाजपाचे नेते व माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यासाठी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि नाही कुणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत,” असं संतापजनक विधान लोणीकर यांनी परतूर येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात केलं आहे. लोणीकर यांच्या भाषणाची क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, विरोधकांनी लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केलेल्या भाषणाची ऑडियो क्लिप सोशल माध्यमातून समोर आली. या भाषणात बोलताना लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा सर्वात मोठा मोर्चा काढण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. विशेष म्हणजे मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी एखादी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि जर कुणी भेटलं नाही, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्या निवेदन घ्यायला येतील, असं विधान लोणीकरांनी केलं आहे.लोणीकरांच्या या विधानावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादीनं लोणीकर यांच्या विधानाचा निषेध केला आहे.