Home मराठवाडा कुख्यात दरोडेखोराला पकडन्यात गंगापूर पोलीसांना यश

कुख्यात दरोडेखोराला पकडन्यात गंगापूर पोलीसांना यश

170

मछिंद्र सुरवसे यांची जीवावर खेळून कारवाई….

अब्दुल कय्युम

औरंगाबाद, दि. ०२ :- गंगापुर तालुक्यातील नवीन कायगाव येथील औरंगाबाद अहमदनगर हायवे रोडवर मोटरसायकलवर पाच दरोडेखोर जात असताना पोलिसांना नागरिकांनी कळवले तात्काळ गंगापूर पोलीस स्टेशनचे पीआय मच्छिंद्र सुरवशे व त्यांच्या सहकारी घटनास्थळी रवाना झाले , पोलिसापाहून दरोडेखोरांनी दगडफेक सुरु केली असता या दगडफेकीत पीआय सुरवसे यांना छाती व पायाच्या नळीवर दगड लागल्यामुळे इजा झाली व यांनी स्वतःच्या सर्विस पिस्तोल नी हवेत दोन राऊंड गोळीबार केला त्यामुळे आरोपी पिस्तोल चा आवाजाने अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले यामध्ये एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आरोपी अमोल सोपान पिंपळे 19 वर्ष राहणार धानोरा आरोपी नंबर .2 अजित शामराव पवार आरोपी नंबर 3 दादा गोविंद साळुंखे राहणार खोकर आरोपी नंबर चार साजन पवार राहणार टाकळीभान तालुका श्रीरामपूर आरोपी नंबर 5 सागर पवार या आरोपी फरार झाले असून पकडलेल्या एका आरोपी सोबत दोन मोटरसायकली चोरीचे कोयता दोरी ताब्यातुन घेण्यात आले यानंतर पोलिसांनी आरोपीला पोलिस कस्टडी मध्ये ठेवले आहे पुढील तपास पीआय मच्छिंद्र सुरवसे हे करीत आहे.