Home महाराष्ट्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना “पञकार संरक्षण समिती”च्या पालघर जिल्हाध्यक्षांचे निवेदन…!

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना “पञकार संरक्षण समिती”च्या पालघर जिल्हाध्यक्षांचे निवेदन…!

192

पालघर (प्रतिनिधी ) – न दैन्यम न पलयानम ब्रिदवाक्य घेऊन घेऊन पत्रकारांचे न्याय व हक्कासाठी संपूर्ण देशभरात कार्यरत असलेली शासन मान्यता प्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या पालघर जिल्हाध्यक्ष मनोज कामडी व पदाधिकारी यांच्या कडून राज्यातील ग्रामीण व शहरी पञकारांच्या समस्या, बाबत आज महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले.

पालघर जिल्हातील प्रगती प्रतिष्ठान या संस्थेला सुवर्ण महोत्सवी शुभारंभ कार्यक्रमा निमित्ताने संस्थापक स्व. वसंतराव पटवर्धन यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण कार्यक्रमासाठी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्री सार्वजनिक बांधकाम,अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालघर पालकमंञी रवींद्र चव्हाण या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते. तसेच राज्यातील ग्रामीण व शहरी पञकारांच्या अनेक समस्या महाराष्ट्र शासन दरबारी पडलेल्या असल्यामुळे निवेदन , ईमेल व प्रत्यक्ष भेटून मांडण्यात आल्या असतांना सुद्धा आज रोजी दि. १० नोहेंबर २०२२ परत स्मरण म्हणून जेष्ठ पञकार पेन्शन योजना बाबत जाचक अटी , पञकार ‌कल्याण निधी व अधिस्विकृती समिती बाबत महामहिम राज्यपाल यांना पालघर पञकार संरक्षण समितीच्या माध्यमातुन ‌निवेदन देण्यात आले. यावेळी पालघर आमदार श्रीनिवास वनगा , आमदार सुनील भुसारा , जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक पालघर संस्थेचे पदाधिकारी व पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.