Home यवतमाळ पुजा चव्हाण प्रकरणातील राईट & फाईट करणार्या चिञा वाघ पञकारांवर भडकल्या…!

पुजा चव्हाण प्रकरणातील राईट & फाईट करणार्या चिञा वाघ पञकारांवर भडकल्या…!

79

 यवतमाळ – महाराष्ट्र राज्याचे अन्न औषध व प्रशासन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याबद्दल प्रश्न विचारताच भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या 

महाराष्ट्र राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप करून आपण त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त केले नाही काय , असा प्रश्न पञकारांनी विचारताच भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या . प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास पत्रपरिषदेत का बोलावले ?, यापुढे अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करायचे नाही , असा दम स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांना पञकारांना दिला तसेच चित्रा वाघ आणि पत्रकारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली . पत्रकारांनी वाघ यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून निषेध नोंदवला . प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारतात चित्रा वाघ विदर्भ दौऱ्यावर निघाल्या असतांना आज शुक्रवारी त्यांनी यवतमाळ येथे भेट दिली . यावेळी स्थानिक यवतमाळ विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारने गेल्या १०० दिवसांत महिलांच्या सन्मानसाठी राबविलेल्या उपाययोजनांची माहिती दिली . यावेळी भाजपाच्या वतीने आयोजित पञकार परिषदेवर बहिष्कार टाकुन निषेध नोंदवित रोष व्यक्त केला .