Home नाशिक मराठी वृत्तवाहिनीचे किरण नाईक यांच्यावरील हल्ल्याचे निवेदन केंद्रीयआरोग्य राज्यमंत्री भारती पवार,जिल्हाधिकारी डी...

मराठी वृत्तवाहिनीचे किरण नाईक यांच्यावरील हल्ल्याचे निवेदन केंद्रीयआरोग्य राज्यमंत्री भारती पवार,जिल्हाधिकारी डी गंगाथरण यांना निवेदन.

428

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर कार्यवाही करा.

“पत्रकार संरक्षण समिती” , अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघटनेचे निवेदन.

नाशिक:- देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे.मात्र अजूनही ग्रामीण/शहरी कष्टकरी पत्रकारांना संरक्षण कायद्याचे संरक्षण नाही.दिवसागणिक पत्रकार, वृत्तछायाचित्रकार यांच्यावर माफियांकडून हल्ले होत आहे.नाशिकमध्ये ही लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार यांच्यावर
तिबेटीयन मार्केट येथे दि २३ मे रोजी दुपारी ४ वाजता किरकोळ वादात गुंडांनी जीवघेणा हल्ला केला.त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे.यासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांनी अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघटना,पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री भारती पवार व नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांना निवेदन देऊन पत्रकारांच्या संरक्षनासाठी थोडं भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार संरक्षण समिती,महाराष्ट्र यांचे वतीने राज्यउपाध्यक्ष राम खुर्दळ,तसेच अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष निशिकांत पगारे,ए.एन आय वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी,सतीश रुपवते,आनंद दाभाडे,रोहन दाणी,स्टार वाहिनीचे रणजित झापर्डे,सह्याद्री वाहिनीचे अनिल वैद्य,भगवान पगारे,सचिन गायकवाड,अमर सोळंके,भरत गोसावी,सागर वाबळे,सचिन पाटील,आस्लम रंगरे,यासह पत्रकार यावेळी उपस्थित होते.