Home महत्वाची बातमी संसारातील सुखात आनंद मिळतो तर परमार्थातील सुखात परमानंद – हभप विष्णु महाराज...

संसारातील सुखात आनंद मिळतो तर परमार्थातील सुखात परमानंद – हभप विष्णु महाराज आनंदे

409

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

संसारातील सुखामध्ये आनंद मिळतो तर परमार्थीक सुखात परमानंदाची प्राप्ती होते.मनुष्य आत्म्याला साधूसंत,महात्मा सुखाचा मार्ग सांगतात.म्हातारपण चांगलं जाण्यासाठी तारूण्यात परमार्थ केला पाहिजे असे प्रतिपादन हभप विष्णु महाराज आनंदे यांनी येथे केले.


मनुष्य आत्मा जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकलेली आहे.आपण मृत्यूलोकात कुठून आल़ो आहोत ? आपला मृत्यूलोकातील ड्रामा संपल्यानंतर आपण कुठे जाणार आहोत? आपले कर्तव्य काय आहे? हे ज्या मनुष्य आत्म्याला कळाले ,तो ज्ञानी समजायचा.
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुनील महाराज येलेकर द्वारा आयोजीत बालवारकऱ्यांच्या संस्कार केंद्र शिबिरात मंगळवारी हभप विष्णु महाराज आनंदे यांचे किर्तन झाले. महाराज किर्तनाच्या ओघात पुढे म्हणाले कि,मनुष्य मनाने,वयाने ,तणाने ,संपतीने कितीही मोठा असला तरी ज्ञानी मनुष्य सर्वात मोठा आहे. संस्कारित मुल विद्वानांच्या गर्दीतही उठून दिसते.बालपणापासून परमार्थ केला तर म्हातारपण सुखात जातं.जीवन कसं जगावं,जीवनाचं महत्व काय आहे ,हे वारकरी सांप्रादायात शिकवलं जातं.महाराज शेवटी म्हणाले हेची दान देगा देवा तुझा विसरन होवा ,ज्या सुखात देव बाजूला राहतो ते सुख नको.