
नमाज पठण करणे झाडे लावणे ,
मुख्य न्याय दंडाधिकारी तेजवंत सिंघ संधू यांनी दिली शिक्षा ,
अमीन शाह ,
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयानं २०१० च्या एका प्रकरणात ३० वर्षीय मुस्लीम युवकाला दोषी ठरवत मशिदीच्या परिसरात दररोज दोन झाडं लावण्यास आणि दिवसातून पाच वेळा 21दिवस नमाज पठण करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी तेजवंत सिंघ संधू यांनी रउफ खान याला दोषी ठरवलं मात्र दुसऱ्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं होतं. यानंतर रउफ खान यानं केवळ २१ दिवस नाही तर संपूर्ण आयुष्यभर नमाज पठण करेन, असं म्हटलं.
मालेगाव येथील मोहम्मद शरीफ शेख यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवली होती. मोहम्मद शेख त्यांच्या मित्राला क्रांती नगर भागात भेटण्यासाठी २८ एप्रिल २०१० ला गेले होते. शेख यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांनी त्यांची गाडी पार्क केली होती. मात्र, नंतर त्या गाडीला रउफ खानच्या रिक्षानं धक्का दिला होता. आमच्या घराबाहेर गाडी पार्क का केली अशी विचारणा करत रउफ खान यानी मारहाण केल्याची तक्रार मालेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात न्यायालयानं चार साक्षीदारांचा जबाब नोंदवला. या प्रकरणाचा निकाल देताना रौफ खान याला दोन झाडं मशीद परिसरात लावण्यास सांगण्यात आलं आहे. झाड लावली जातात की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयानं कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे. वकील नसरीन मेमन यांनी रउफ खान याला २१ दिवस दिवसातून ५ वेळा नमाज पठण करण्याचे आदेश न्यायालयानं दिल्याचं म्हणाले. न्यायालयानं दोषी व्यक्तींना सुधारण्याच्या दृष्टीनं दिलेला निकाल महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले











































