Home यवतमाळ भाजपा जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा पदाधिकारी यांची...

भाजपा जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा पदाधिकारी यांची नियुक्ती…!

89

विनोद पञे 

यवतमाळ – घाटंजी येथील युवा उद्योजक तथा भारतीय जनता युवा मोर्चा चे माजी शहराध्यक्ष श्री भावेशजी प्रदीपराव सूचक यांची आज मा श्री नितीनभाऊ भुतडा (जिल्हाध्यक्ष भाजपा) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री आकाशजी धुरट यांनी यवतमाळ जिल्हा भाजपा युवा मोर्चा च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.भावेश सुचक यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी श्री राजूभाऊ पडगीलवार जिल्हा सरचिटणीस भाजपा,श्री मोहनभाऊ जाधव (जिल्हाध्यक्ष वि ज भ ज),श्री विलासभाऊ महाजन (संयोजक सहकार आघाडी पश्चिम विदर्भ ),राजू शुक्ला जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,बाळासाहेब शिंदे,यवतमाळ विधानसभा प्रमुख,दिलीपभाऊ मादेश्ववार,विस्तारक, स्वप्नील मंगळे (भाजपा विधानसभा प्रमुख आदिवासी आघाडी,)गोपाल काळे,रावडी राठोड, इत्यादी उपस्थित होते.