Home वाशिम वाशिम जिल्हयात जुगार रेड करुन १२ आरोपीतांवर गुन्हे दाखल

वाशिम जिल्हयात जुगार रेड करुन १२ आरोपीतांवर गुन्हे दाखल

205

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवायंचा तडाखा

मंगरुळपीर:-मा. पोलीस महासंचालक म.रा. मुंबई यांचे आदेशाने संपुर्ण महाराष्ट्रात दिनांक ०१/०४/२०२२ ते १५/०४/२०२२ अवैध धंदयाविरुध्द विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिल्याने संपुर्ण वाशिम जिल्हयात मा श्री बच्चन सिंह पोलीस अधीक्षक वाशिम यांनी जास्तीत जास्त कारवाया करण्याबाबत आदेशित केले.
त्या अनुषंगाने वाशिम जिल्हयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर कायदयाचा चांगलाच बडगा उचलला आहे.
आज दिनांक १३/०४/२०२२ रोजी .गुप्तबातमीदाराचे बातमीवरून पोलीस स्टेशन वाशिम शहर अंतर्गत महात्मा फुले मार्केट वाशिम येथे अवैधरित्या चालणाऱ्या वरली मटका जुगारावर रेड करून आरोपी इसम नामे १)गोपाल शिवाजी नंदापुरे रा वाशिम ता. जिल्हा वाशिम व इतर ६ फरार यांचे जवळुन वरली मटका जुगार साहीत्य व नगदी ५६८० /- रू चा मुददेमाल जप्त करून १२ अ जुगार अॅक्ट प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. तसेच वाशिम शहरातील बालाजी कॉम्प्लेक्स येथे वरली मटका जुगारावर रेड करुन आरोपी १) योगेश भागवत घायाळ रा परळकर चौक वाशिम, ता जि वाशिम व इतर फरार यांचे जवळुन वरील मटका जुगार साहित्य असा एकुण ४३२०/- रु चा मुददेमाल जप्त करुन १२अ जुगार अँक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली व असा एकुण १०,०००/- रू माल जप्त करण्यात आला नमुद कार्यवाही मा. श्री बच्चन सिंह पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव,सपोनि अतुल मोहनकर,पोलीस हवालदार सुनिल पवार,पोना प्रशांत राजगुरु,राजेश राठोड,पोकाँ अवनिाश वाढे याचे पथकाने केली.जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी अवैध धंदाविरुद्ध सुरू केलेली मोहिम अधिक तिव्र केली असुन सदर बाबत नागरिकांमध्ये सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपणास काही आक्षेपाहर्य आढळल्यास त्याबाबत आपण निसंकोच पणे नियंत्रण कक्ष वाशिम येथे माहिती कळवावी. माहिती देणान्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206