Home बुलडाणा संविधानाने देशाला एक सूत्रात बांधले : रमेश कायंदे

संविधानाने देशाला एक सूत्रात बांधले : रमेश कायंदे

23
0

 

 मातृतिर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी:( रवि आण्णा जाधव )

 देऊळगावराजा :  जगाला या गोष्टीचे कौतुक आहे की, भारतात विविध जाती विविध धर्म विविध पंतांचे लोक एकत्र कसे राहू शकतात. तर ही किमया संविधानाने शक्य होऊ शकली असून संविधानाने देशाला एक सूत्रात बांधून ठेवले आहे. आपल्याला बालपणीच शाळेतील प्रतिज्ञाच्या माध्यमातून सर्व जाती धर्म परंपराचा आदर करण्याचा बाळकडू पाजवले जाते, असे मत सेवानिवृत्त उपजिल्हा अधिकारी रमेश दादा कायंदे यांनी मातृतिर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमात   व्यक्त केले.

     स्थानिक आर्चाय बाळशास्त्री जांबेकर सार्वाजनिक वाचनालय व मातृतीर्थ सभागृह येथे मातृतिर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली. सर्व प्रथम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडर यांच्या प्रतिमेस पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश दादा कायंदे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी न.प.उपाध्यक्ष पवन झोरे, माजी न.प.गटनेत्या सौ.सुनिता सवडे, गणेश सवडे, पत्रकार सुरज गुप्ता, राजमुद्रा करिअर केअर अँड फिजिकल अकॅडमी चे दिनेश सोळूंके सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुषमा राऊत यांनी कार्यक्रमाचे उद्देश मांडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी यांनी आर्चाय बाळशास्त्री जांबेकर वाचनालयाला पुस्तके भेट दिली. पुढे बोलतांना कायंदे म्हणाले की,  डॉ. आंबेडकर यांची उच्च बुद्धिमत्ता, त्यांचा जीवन संघर्ष आणि वंचित घटकांच्या प्रती असलेली अपार सहानुभूती यांचा मिलाप त्यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून केलेल्या राज्यघटनेत दिसून येते. देश कसा असेल? यावरच न थांबता तो कसा घडेल याची निश्चिती मार्गदर्शक तत्त्वाद्वारे केली आहे. यावेळी सौ.सुनिता सवडे, गणेश् सवडे, पत्रकार सुरज गुप्ता यांनी  विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. या अभिवादन कार्यक्रमात राजमुद्रा करिअर केअर अँड फिजिकल अकॅडमीच्या लेझिम पथकाने उत्तम सादरीकरण करुन उपस्थित नागरिकांचे व मान्यवरांचे मने जिंकली. याप्रसंगी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश साकला, सचिव प्रशांत पंडित, बाबासाहेब साळवे, अशरफ पटेल, राजमुद्र कॅरीअर अ‍ॅकडमीचे सर्व विद्यार्थी आदी उपस्थि होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुषमा राऊत यांनी केले तर आभार पत्रकार संरज गुप्ता यांनी मानले. 

Previous articleIPL क्रिकेट सट्टा, मंगरुळपीर येथे रेड, ३० आरोपी विरुध्द कारवाई
Next articleवाशिम जिल्हयात जुगार रेड करुन १२ आरोपीतांवर गुन्हे दाखल
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.