Home मुंबई सामाजिक संदेश देणारा झुंड कर मुक्त करावा. पँथर डॉ. राजन माकणीकर

सामाजिक संदेश देणारा झुंड कर मुक्त करावा. पँथर डॉ. राजन माकणीकर

290

 

मुंबई , (प्रतीनिधी) –  दुर्लक्षित समाज ज्यांना प्रस्थापितांनी पूर्ण पणे नाकारलेले आहे अश्या तरुणाईच्या सामाजिक, आर्थिक, कौटूंबिक परिस्थितीचे वास्तव चित्रण असलेला नागराज मंजुळे यांचा झुंड जर मुक्त करावा असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर म्हणाले की, सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार त्याचित्रपटांना करमुक्त करते, त्याचप्रमाणे नागराज मंजुळे दिग्दर्शीत व अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने नटलेल्या झुंड या चित्रपटाला करमुक्त करण्यात आले पाहिजे.

वास्तववादी चित्रण व दुर्लक्षित समाजाचे वास्तव नागराज मंजुळे यांनी पडद्यावर उतरवून व्यवस्थेवर आसूड उगारला आहे. शतकानंतर शिव फुले शाहू आंबेडकर व भीमजयंती हिंदी सिनेसृष्टी पहिल्यांदाच झळकतेय.

महामानव व महानायकांना एकाच ढाच्यात आणून तरुणाईला एक नवी उमेद देण्याचा मानस ठेवून एक प्रेरणादायी चित्रपट निर्माण करून अन्य दिग्दर्शकांना चपराक देण्याचं धाडस केले हे फार कौतुकास्पद आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ डेमोक्रॅटिक, पँथर ऑफ सम्यक योद्धा टीम व वयक्तिक त्यांचे अभिनंदन करत असून सदैव त्यांच्या गरजेला पडण्याचे अभिवचन डॉ. माकणीकर यांनी दिले.