Home विदर्भ मोटार सायकल चोरटे पोलीसांच्या जाळ्यात ,  चार दुचाकी जप्त…!!

मोटार सायकल चोरटे पोलीसांच्या जाळ्यात ,  चार दुचाकी जप्त…!!

170

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही…!!

रवि माळवी

यवतमाळ , दि. २८ :- दोन चोरट्यांनी संगणमत करुन शहरातील तसेच बाहेर जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून चार दुचाकी चोरुन नेवून एका शेतात ठेवल्या होत्या. एक चोरटा आरोपी त्यापैकी एक चोरीची दुचाकी घेवून यवतमाळ कडून घाटंजीकडे जात असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चापडोह परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. पोलीसांनी ही कार्यवाही दिनांक २७ जानेवारी रोजी केली.
निलेश भानुदास कोयरे (२५वर्षे) रा.येवती, पोलीस पो.स्टे.वडगांव जंगल जि.यवतमाळ व दुसरा रमीम शेख रफीक शेख (२५वर्षे) रा.मौलाना आझाद नगर पांढरकवडा असे पोलीसांनी अटक केलेल्या दुचाकी चोरट्यांचे नावे आहेत. दिनांक २७ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार हे त्यांचे पथकासह गुन्हेगार शोध कामी पेट्रोलींग करीता मौजा चापडोह परीसरता गेले असता त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन एक ईसम हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळ्या रंगाची चोरीची मोटार सायकल घेवून यवतमाळ कडून घाटंजीकडे जात असतांना पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार हे पंच व पोलीस स्टाफ सह चापडोह परिसरात सापळा लावून थांबले. माहीती प्रमाणे वर्णनाचा ईसम एका काळ्या रंगाचे हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकलवर येतांना दिसून आल्याने त्यास पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव निलेश भानुदास कोयरे असे सांगीतल्याने त्यास त्याचे ताब्यातील वाहनाबाबत विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरचे वाहन काही दिवसांपुर्वी त्याचा पांढरकवडा येथील साथीदार रमीम शेख याचे सोबत मीळून शासकीय रुग्णालय यवतमाळ येथून चोरुन आणल्याचे सांगीतल्याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल जप्त करुन पांढरकवडा येथून रमीम शेख रफीक शेख यास ताब्यात घेवून विश्वासात घेतले व विचारपुस केली असता त्याने सांगीतले की मागील काही महिण्यांमध्ये तो व त्याचा साथीदार निलेश कोयरे असे दोघांनी मिळून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून एक मोटार सायकल, भोसा रोड वरील पेट्रोलपंपा जवळुन एक, धामणगांव रोड वरुन एक मोटार सायकल, कारंजा जि.वाशीम येथून एक मोटार सायकल चोरुन आणल्याचे सांगून तीन मोटार सायकल निलेश कोयरे याचे शेतात ठेवल्या असल्याचे सांगीतल्याने पंचा समक्ष सदरच्या सर्व मोटार सायकली एकुण किंमत १ लाख ७ हजार रुपयाच्या जप्त करुन आरोपींना पुढील कार्यवाही कामी यवतमाळ शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार व त्यांच्या पथकाने चोरट्या आरोपींकडून तीन हिरो होंन्डा स्लेंडर व १ हिरो पॅशन अशा एकुण ४ मोटार सायकल जप्त करुन अवधुतवाडी पोलीस स्टेशन येथील एक व यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथील एक असे दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून दोन मोटार सायकल चोरी अनुषंगाने अभिलेख पडताळणी सुरु आहे. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नूरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, ओमप्रकाश यादव, विशाल भगत, मो.जुनेद, रोशनी जोगळेकर, जितेंद्र चौधरी सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली.