Home मराठवाडा विद्यार्थ्यांन मध्ये ज्ञानाची कमतरता नसून त्यांच्या कलागुणांनाचा योग्य वापर – डॉ. दत्ताभाऊ...

विद्यार्थ्यांन मध्ये ज्ञानाची कमतरता नसून त्यांच्या कलागुणांनाचा योग्य वापर – डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर

99

सय्यद नजाकत

जालना / बदनापूर , दि. 28 :– ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन मध्ये ज्ञानाची कमतरता नसून त्यांच्या कलागुणांनाचा योग्य वापर केला तर विद्यार्थ्यांमधील कल्पकता दिसून येते त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पैलू पाडून त्यांच्यातील संशोधन हेरून काम करण्याची गरज डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी व्यक्त केली.

निर्मल क्रीडा समाज प्रबोधन ट्रस्टच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनांतर्गत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर हे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. नारायण कुचे, पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर, शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, डॉ. देवेश पाथ्रीकर, हरीश्च्रद्र शिंदे, डॉ. शेख एस. एस. डॉ. खान एन. जी. मदन, डॉ. झेङ ए. पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. पाथ्रीकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेली असल्याचा उल्लेख करून यातूनच भावी वैज्ञानिक बनू शकतात त्यामुळे शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाबरोबरच नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून देण्यात यावा , असे प्रतिपादन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आ. नारायण कुचे म्हणले की, बदनापूर हा तालुका शैक्षणिकदृष्टया अतिशय मागासलेला होता. तरीही डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी या तालुक्यात शैक्षणिक सोयी सुरू करून दिल्यामुळे या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी एकाच छताखाली निर्माण होऊ शकल्या. विज्ञान प्रदर्शनातील मुलींचा सहभाग पाहून मुली याच कुळाची पणती असल्याचा उल्लेख करून मुलगी ही लक्ष्मी असल्याचा उल्लेख करून विद्यार्थींनीचा हुरूप वाढवला. उद्रघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शेख एस. एस., सूत्रसंचालन डॉ. राहुल हजारे, आभार डॉ. एम. पी. जोशी यांनी केले. विज्ञान प्रदर्शनात विविध वैज्ञानिक व दैनंदिन वापरात येऊ शकेल असे शोध विद्यार्थ्यांनी सादर केले. संस्थेंतर्गत असलेल्या इन्स्टीटयूट ऑफ फार्मसी व विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शना सहभाग नोंदवला. यावेळी टिंवकल स्टार स्कूलच्या विर्थ्यानी तयार केलेले नैसर्गिक साधनाचा वापर करून शेतीतील वन्यजीव व प्राणी हाकलून लावण्यासाठी तयार करण्यात आलेली तोफ सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी रसायानशास्त्र, भौतिक शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्प्तीशास्त्र, गणित, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, संगणकशास्त्र या विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यानीही अनेक प्रयोग सादर केले.

दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनास तालुक्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेटी देऊन प्रयोगांची पाहणी केली. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी विज्ञानातून अंधश्रध्दा निर्मलन करण्याचाही प्रयत्न केला. ग्रामीण भागात एवढया भव्य्‍ा प्रमाणात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयातील विज्ञान प्रदर्शन समितीने केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.