सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. 28 :- महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे वतीने आज दि.29 जानेवारीला सकाळी 9.30 वाजता निर्यात सुविधा केंद्र कारंजा येथे शेतक-यांसाठी संत्रा उत्पादन व निर्यातवृध्दी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेला, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनीधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळच्या विभागीय कार्यालय नागपूरचे उपसरव्यवस्थापक एम.एस. गवळे यांनी केले आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रिय लिंबूवर्गीय फळे संशोधन संस्थाचे संचालक डॉ. एम.एस. लदादिया यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाला महाऑरेंजचे कार्यकारी भागीदार श्रीधरराव ठाकरे, विभागीय कृषि सहसंचालक रविंद्र भोसले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, नागपूरचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मिलींद शेंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतम वालदे, नागपूरचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांची उपस्थिती असणार आहे. तर कार्यशाळेस निर्यातक्षम संत्रा लागवड, उत्पादन व काढणीनंतर तंत्रज्ञान विषयावर एम.एस. लदानिया, संत्रा एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन डॉ. सुभाषकुमार, संत्रा थेट विक्री व्यवस्थापन अच्युत सुरवसे, निर्यांतक्षम संत्रा फळपिकांची ट्रेसिबिलीटी सिट्रसनेटव्दारे नोंदणी अर्चना कडू, कृषि विभागाच्या योजन मिलिंद शेंडे, संत्रा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारातील संधी व आव्हाने निशांत शेंडे व कृषि पणन मंडळाच्या विविध योजना व उपक्रम या विषयावर मच्छिद्र गवळे मार्ग दर्शन करणार आहे.
