Home जळगाव पत्रकार दिन व रस्ता सुरक्षा अभियान निमित्त जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेटचे वाटप...

पत्रकार दिन व रस्ता सुरक्षा अभियान निमित्त जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेटचे वाटप होणार

128

लियाकत शाह

जळगाव , दि. २८ :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय जळगाव तथा नजर फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ६ फेब्रुवारी २०२० रोजी पत्रकार दिनाचे व रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवाना हेल्मेट वाटप करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे ठीक १.३० वा.सुरु होईल. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे हे असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून आ.किशोरअप्पा पाटील, आ.राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, दैनिक लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे हे असणार आहे. त्याच बरोबर मुकुंद बिलधीकर, प्रविणसिंग पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संजय कुमावत, गोविंद शिरोळे, प्रदीप शांताराम पाटील, व्यंकटेशअण्णा कलाल, पत्रकार संघांचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे याची उपस्थित राहणार आहे. पत्रकारांनी कार्यक्रमाला येतांना आपल्या वृत्तपत्र संस्थेचे ओळखपत्र सोबत आणावे.आल्यावर पुन्हा सभागृह स्थळी आपले नाव नोंदणी करून आयोजक यांच्या कडून कुपन घ्यावे.त्यानंतरच हेल्मेट वाटप होईल. कार्यक्रम पत्रकार बांधवांसाठी असून सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून सहकार्य करावे असे अवाहन पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, वृत्त वाहिनी विभाग जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, वृत्त वाहिनी विभाग कार्यध्यक्ष संतोष ढिवरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण कार्यध्यक्ष भगवान मराठे, जिल्हाउपाध्यक्ष नरेश बागडे, सुनील भोळे, मुकेश जोशी, दीपक सपकाळे, रितेश माळी, चेतन निंबोळकर, स्वप्नील सोनवणे यांनी केले आहे.