Home विदर्भ चला गावाकडे प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम…!!

चला गावाकडे प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम…!!

53
0

मनोज गोरे

चंद्रपुर , दि. २८ :- आज दिनांक २८/०१/२०२० रोज मंगळवार ला मौजा बोरगांव बुज.ता.कोरपना जि.चंद्रपूर येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालीत प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय कोरपनाच्या लोकसंख्या शिक्षण मंडळाचे वतीने शासनाचे अधिकारी व आदिवासी ग्रामस्थ यांच्यातील एक दुवा म्हणून चला गावाकडे या संकल्पनेवर आधारित दत्तक ग्राम शैक्षणिक उपक्रमा‌ अंतर्गत बोरगांव बुज.येथे १००% आदिवासी गावात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराकरीता मा.श्री. सिताराम कोडापे माजी जि.प.सदस्य चंद्रपूर, श्री. सत्यवान आत्राम सरपंच, श्री. विनायक जिवतोडे उपसरपंच श्री. मारोती पा.किन्नाके गावपाटील,श्री.लक्ष्मण पा.किन्नाके सेवानिवृत्त पोस्टमास्त ,श्री. हरीचंद्र पा.किन्नाके पो.पा.आणि गावातील प्रतीष्ठीत नागरिक आणि समस्त गावकरी सहकार्य केले,या करीता ग्रामीण रुग्णालय कोरपना येथील आरोग्य तपासणी विभागातील अधिकारी डाॅ. जिवतोडे यांच्या चमूने सहकार्य केले.तसेच पोष्ट खात्याच्या मार्फत गावकर्यांचे पोष्ट खाते सुध्दा काढण्यात आले.या करीता पोष्ट खात्यातील धानोली,येरगव्हान, कोरपना, शेरज या गावचे कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांचे आभार प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय कोरपना अर्थशास्त्र विभाग प्रमुख व लोकसंख्या शिक्षण मंडळाचे समन्वयक प्रा.डॉ. व्हि.डब्ल्यू. मालेकार यांनी मानले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री दिनेश किन्नाके यांनी मोलाचे सहकार्य केले.