Home नांदेड पाटोदा गावच्या तंटामुक्त समितीची बैठक संपन्न ,अध्यक्षपदी पुंडलिक जाधव तर उपाध्यक्ष पुंडलिक...

पाटोदा गावच्या तंटामुक्त समितीची बैठक संपन्न ,अध्यक्षपदी पुंडलिक जाधव तर उपाध्यक्ष पुंडलिक समसते

535

धर्माबाद : ता. प्रतिनिधी राहुल वाघमारे

धर्माबाद २६ जानेवारी रोजी पाटोदा खु येथे नुकतीच पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून पुंडलिक जाधव तर पुंडलिक समसते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. २६ जानेवारी रोज सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन अध्यक्ष उपसरपंच अंजली सुनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सभेत ग्रामविकास व इतर विषयावर चर्चा झाली.नियमानुसार दर ५ वर्षाने तंटामुक्ती अध्यक्षाची निवड केल्या जाते त्याच अनुषंगाने गावातील सुपरिचित, शांत स्वभाव तसेच गावातील सर्व लोकांसोबत मधुर समंध असलेले व अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या पुंडलिक पाटील जाधव . यांची ग्रामवासीयांनी बिनविरोध निवड केली. गावातील लहान मोठे तंटे पोलीस स्टेशन पर्यंत न येता आपसात भांडण तंटे मिटवावे या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची स्थापना केल्या गेली आहे. गावातील लहान मोठे कोणतेही भांडण तंटे ठाण्यापर्यंत न जाता आपसातच मिटविण्याचे पुंडलिक पा जाधव .व पुंडलिक समसते यांनी ठाम भूमिका घेतली आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकऱ्यां कडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.