Home जळगाव ” उर्दू शाळा रंगली मराठी भाषेत”.

” उर्दू शाळा रंगली मराठी भाषेत”.

160

मिल्रत हायस्कूल मेहरूण मध्ये मराठी भाषा पंधरवडा संपन्न.


जळगाव : {एजाज़ गुलाब शाह} – महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकास मराठी भाषेत आपले विचार मांडता यावे, मराठी भाषेची आपुलकी, आवड व ज्ञान वाढावे, जास्तीत जास्त मराठी भाषेतच संवाद करता यावे, राज्यभाषेची जोपासना व्हावी.त्यासाठी महाराष्ट्रशासन मराठी भाषा विभागातर्फे दर वर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा, साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने मिल्लत हायस्कूल मेहरूण जळगाव. येथे मराठी भाषा विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, अनुलेखन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात 108 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविले. विद्यार्थ्यांनी आपल्या सुवाच्छ व सुंदर अक्षरांत निबंध लेखन व अनुलेखन केले. मराठी भाषा विभाग प्रमुख वसीम शेख यांनी मराठी भाषेचे महत्व व्यक्त केले. मुख्याध्यापीका सौ. अफिफा शाहीन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढवले. कार्यक्रमास भारदस्तपणा यावा त्यासाठी मुख्याध्यापीकांनी दाखवलेल्या उत्साहाच्या प्रती श्री. हफीज़ शेख यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी विभागाचे सदस्य श्री. ताजोद्दीन सर, श्री. शफकत सर व सौ. समिना मॅडम यांनी परिश्रम घेतले.

छायाचित्रात : पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांत सहभागी विद्यार्थी तर निरीक्षण करतांना पर्यवेक्षक ताजोद्दिन शेख , मराठी भाषा विभागाचे सदस्य शिक्षक वृंद, सोबत मराठी भाषेची माहिती देतांना मिल्लत हायस्कूलचे पर्यवेक्षक ताजोद्दिन शेख, डावीकडून वसीम शेख, हफीज मणियार, मुख्यध्यापिका अफिफा शाहीन, व समीना म्याडम दिसत आहेत.