Home जळगाव जळगाव मुस्लिम मंच आयोजित तिरंगा मार्च न भूतो न भविष्यती

जळगाव मुस्लिम मंच आयोजित तिरंगा मार्च न भूतो न भविष्यती

340

मुस्लिम तरुण व तरुणाई रस्त्यावर भारता च्या जिंदाबाद साठी थिरकली

रावेर – शरीफ शेख

जळगाव , दि. २७ :- मुस्लिम मंच जो भारतीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ३१ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करीत आहे त्याच मुस्लिम मंचने आज उपोषण न करता ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव शहरातून १७१ मीटर लांबीच्या तिरंगा घेऊन रॅली काढली.

*प्रथम झेंडा वंदन नंतर मार्च*
३२ दिवसा पासून सुरु असलेल्या उपोषण स्थळी फारूक शेख यांनी राष्ट्रीय ध्वज फड़काऊन त्यास मानवंदना दिली तय वेळी मंच चे पदाधिकारी उपस्थित होते.
*तिरंगा मार्च ची सुरवात*

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रतिभा शिंदे लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्ष यांनी तिरंगा मार्चला हिरवी झेंडी देऊन तिरंगा मार्च ला सुरवात करण्यात आली.
*महापुरुषांच्या प्रतिमेला रेली मार्फत अभिवादन*
जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झालेली तिरंगा रॅली लाल बहादूर शास्त्री अर्थात टावर चौकात आली असता तिथे त्यांना अभिवादन करून सरळ चित्रा चौक मार्गे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आली असता त्यांनाही अभिवादन करण्यात आले तेथून शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात ला या तिरंगा मार्चचा समारोप करण्यात आला.
*१७१ मीटर लांबीचा व ७ फुट रुंडीच तिरंगा*
७१ वा प्रजासत्ताक दिवस असल्याने १७१ मिटर लांबीचा व आठ फूट लांबीचा असा हा तिरंगा जळगाव शहरातील मिल्लत,एंग्लो,इकरा,ए के के या महाविद्यालयातील तरुण व तरुणींनी तसेच जळगाव मुस्लिम मंच व संविधान बचाव कृती समितीच्या हिंदू-मुस्लीम समाज बांधव व भगिनींनी हा तिरंगा आपल्या खाद्यावर घेऊन तो पूर्ण सन्मानाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत शिस्तीने आणला.
*तिरंगा मार्च चे वैशिष्ट्य*
१) तिरंगा मार्च च्या सुरुवातीला मुस्लिम मंचचे समन्वयक फारुक शेख यांनी तरुणाईला फक्त सात मिनिटे मार्गदर्शन करून हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यामागील उद्देश व त्यासाठी आपणास करावी लागणारी शिस्त याबद्दल मार्गदर्शन केले कारण फक्त एक दिवसात हा कार्यक्रम ठरला म्हणून मार्गदर्शन करताच त्याचे पूर्ण पालन तरुणाई ने केले
२)संपूर्ण रॅलीमध्ये एकही पोलीस अधिकारी वा कर्मचारी कामगिरीवर नसताना सुद्धा संपूर्ण रॅली अत्यंत शिस्तबद्ध व इतर वाहतुकीला अडथळा न करता कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेला बाधा न आणता ही रॅली पूर्ण करण्यात आली.
३) रॅलीच्या शेवटी अश्फाक बागवान यांनी केळी तर गुलाब बागवान यांचे तर्फे वड़ा पाव सर्वाना देण्यात आले
४)सदर तिरंगा साठी डॉक्टर अमानुल्ला शाह, मजिद झकेरिया, गफ्फार मलिक, करीम सालार व एडवोकेट आमिर फारुक शेख यांचे सहकार्य मिळाले.
५) मार्चमध्ये मदरसा चे साठ लहान बालके रस्त्यावरील सर्वांचे लक्ष वेधीत होते कारण त्यांनी आपल्या डोक्यावर तिरंग्याचे फेटे घातलेले होते
६) मोर्च्या समोर तीन घोड्यावर तरुण तर त्या मागे तीन तरुणी भारताचे रक्त रंजित नकाशा घेऊन चालत होते
७)संपूर्ण रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारचे निषेध, मुर्दाबाद अथवा नकारात्मक घोषणा न देता भारताचे प्रजासत्ताक दिन चिरायू हो, भारत जिंदाबाद ,संविधान जिंदाबाद व सर्व महापुरुषांच्या जिंदाबाद च्या घोषणा देण्यात येत होत्या.
८)तिरंगा मार्चमध्ये या प्रमुखांचा होता सहभाग लोकसंघर्ष मोर्चा च्या प्रतिभा शिंदे ,मराठा क्रांती चे विनोद देशमुख, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, आंबेडकर वादी संघटनेचे मुकुंद सपकाळे, काँग्रेसचे संदीप पाटील व मुफ़्ती अतीक, मेमन बिरादरी चे मजीद ज़केरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे गफ्फार मलिक, कुल जमातीचे सैयद चाँद व बशीर बुरहानी, सुन्नी जमात चे शरीफ शाह व अयाज़ अली, यांचा समावेश होता
९) तिरंगा मार्च मधे घोड्यावर गफ्फार मालिक,सैयद चाँद, मुफ़्ती हारून,फारूक शेख,सलिम शेख,अनवर सिकलीगर,सचिन धांडे,मुकुंद सपकाले यांनी सुद्धा बसून काही मार्ग चालले
१०) तिरंगा मार्च च्या शेवटी राष्ट्रगीत सादर झाले तेव्हा रसत्यवारील वाहतूक व मार्गस्थ आपल्या जागेवर थाबुन गेले
११) *तिरंगा मार्च यशस्वी करणारे सहकारी*
फारुक शेख यांच्या नेतृत्वात फारुख आहिलेकार, सलीम रेडिएटर, मोहसीन खान, शाहिद सय्यद, अन्वर सिकलिगर, रऊफ खान ,समीर शेख ,शरीफ शाह, तय्यब शेख, आसिफा शेख, सौ अफसर कबीर ,सौ नुरजहा शेख, सौ तसलीम शहा,सौ सिमी सदफ, वहीद अन्सारी ,गुलाब शेख, अकील ब्यावली,अबु रेहान, ताहेर शेख, रफिक शेख, अल्ताफ शेख, रउफ टेलर, सलीम शेख, रफिक शफी,तसेच इकरा डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, शाहीन हायस्कूल, थीम कॉलेज, अँग्लो उर्दू जुनियर कॉलेज, ए के के ज्युनियर कॉलेज, मिल्लत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, येथील विद्यार्थी व शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.