Home विदर्भ श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालय नायगाव येथे ध्वजारोहण

श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालय नायगाव येथे ध्वजारोहण

58
0

यवतमाळ , दि. २७ :- नायगाव ता. बाभुळगाव येथे ७० व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्थानिक श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालय नायगाव येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामजी राऊत यांनी ध्वजारोहण केले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मोहन कापसे, सहसचिव निखिल सायरे, सदस्य प्रशांत राऊत, धिरज सायरे, यांचेसह ग्रामपंचायत नायगाव चे सन्माननीय सरपंच, उपसरपंच व सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरीक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या ग्रंथपाल सौ. उषा सायरे व शिपाई भारत राठी यांनी केले.