Home विदर्भ गावसमाजाचा पुढाकार वाढावा, या करीता संवाद फाऊंडेशनच्या वतीने विद्यांर्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप.!

गावसमाजाचा पुढाकार वाढावा, या करीता संवाद फाऊंडेशनच्या वतीने विद्यांर्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप.!

93

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २६ :- संवाद फाउंडेशन संस्था अड्याळ च्या वतीने जि.प.प्राथमिक शाळा पिंपळगांव भंडारा येथील विद्यार्थ्याना संवाद फाउंडेशनसंस्थेचे अध्यक्ष श्री.दीपक मरघडे यांच्या हस्ते नोटबुक , पेन , पेन्शिल व स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले.यावेळी दीपक मरघाडे विद्यार्थीना मार्गदर्शनकरतांना म्हणाले की,
ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेञात पुढाकार घ्यावा विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व कोणतेही गरीब आर्थिक दृष्टया कमकुवत असलेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी गांवसमाजाचा पुढाकार वाढावा हे प्रेरणादायी देण्यासाठी संस्था उपक्रम राबवित असल्याचे दीपक मरगाडे यांनी सांगीतले.
या वेळी संस्थेचे सचिव अरुण देशमुख , ग्रामसभा सचिव महेंद्र भलवी , सरपंच व उपसरपंच गटग्रामपंचायत खुटसावरी , जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद व ग्रामसभा प्रतिनिधी तुकाराम खंडाते , रामकृष्ण उईके व इतर मान्यवर उपस्थित होते.