झाडगाव – बाबाराव इंगोले
अमरावती / धामणगांव , दि. २६ :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्साह ने साजरा करण्यात आला सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर संविधानाच्या उदेशिकेचे वाचन मा. धकाते सर यांनी करून घेतले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक मा. देशमुख सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मानवंदना देऊन राष्ट्र गीत घेण्यात आले.
त्यानंतर शाळेच्या विध्यार्यांनी संपुर्ण गावामध्ये भारत माता की जय प्रजासत्ताक दिन चिरायू हो अशा गर्जना करीत मार्च काढण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्तविक मा. घकाते सर यांनी केले तसेच मुख्यघ्यापक मा देशमुख सर यांनी विघ्यार्त्यांकरिता विशेष सोय करण्यात येईल अशी माहिती दिली या कार्यक्रमाला प्रामुख्याने शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. दीपक शेंडे उपस्तीत होते , त्याचप्रमाणे गावातील सरपंच सौ. प्रियांका तितुरंमारे उपसरपंच मा. प्रफुल ठवकर पोलिस पाटील दौतपुरे सचिव टसर साहेब व सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य सौ. संगीता ताई ह्या प्रनुख्याने उपस्तीत होते.