Home बुलडाणा बुलडाणा येथे शिवथाळी चे शुभारंभ…!

बुलडाणा येथे शिवथाळी चे शुभारंभ…!

144

अमीन शाह

महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन योजनेचा आज प्रजासत्ताकदिनी बुलडाणा शहरात ३ ठिकाणी शुभारंभ करण्यात आला.
बसस्थानक, जिजामाता प्रेक्षागार व कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवभोजनालयाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शिंगणे, जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा, जि.प.चे सीईओ षन्मुखराजन, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदींनीही शिवथाळी भोजनाचा आस्वाद घेतला. दुपारी १२ ते २ यावेळेत केवळ १० रू.शुल्कात ही शिवथाळी दिली जाणार आहे.